SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार, योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार?

भारत हा कृषिप्रधान देश असला तरी अनेक कारणांमुळे पिकाला नुकसान सोसावं लागतं. परिणामी शेतकरी पशुपालनावर जोर देतात. पण आजकाल असं झालं आहे कि शेतीसंबंधित बरेच व्यवसाय लोक करत नाहीत. भारतात एक असा मोठा वर्ग आहे जो कामगार आणि मजूर वर्ग आहे. भारतातील जास्तीती जास्त लोकसंख्या गरीब आणि कामगार लोकांची आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही पार्लर आणि शिलाई मशीन घेऊन व्यवसाय करत असतात.

कधी कधी महिलांना स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी भयानक परिस्थितीचा सामना करावा लागतो. देशातील लाखो गावांमध्ये काही महिलांना अजूनही काही व्यवसाय करण्याचं म्हणा किंवा बाहेर काम करण्याचं स्वातंत्र्य नाहीये अर्थात यात सुरक्षिततेचा प्रश्नही येतो हेदेखील आहे. पण समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने या महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केली.

Advertisement

वाचा योजनेविषयी सविस्तर..

भारत सरकारच्या या योजनेत महिलांना मोफत शिलाई मशीन दिले जातात. या योजनेतंर्गत देशातील प्रत्येक राज्यात 50 हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन दिले जाते. केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊन महिला स्वावलंबी बनू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. या योजनेचा फायदा फक्त महिला घेऊ शकतात अशी माहिती आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन महिलांना प्रत्येक महिन्याला चांगली कमाई करता येते. मोफत शिलाई मशीन गरीब आणि कष्टकरी महिलांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराची संधी उपलब्ध करून देते. मोफत शिलाई मशीन योजनेचा फायदा शहरी तसेच ग्रामीण भागातील महिला घेऊ शकतात. या मशीनमुळे महिला कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात. जर तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लाभ घेण्यासाठी महिला 20 ते 40 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहेत.

गरीब आणि कष्टकरी महिलांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा होत आहे. घरबसल्या कष्ट करून स्वयंरोजगार उपलब्ध झाल्याने महिला हजारो रुपये कमवू शकतात. महिन्याला चांगली कमाई करता येते. दुर्बल घटकातील महिलांचे आर्थिक राहणीमान सुधारण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतील.

Advertisement

अर्ज करायचा असेल तर वाचा..

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच पुढील लिंकवर https://www.india.gov.in/ क्लिक करावं लागेल. त्यानंतर त्याठिकाणी अर्ज डाऊनलोड करावा लागेल. अर्जासोबत लागणारी कागदपत्रे लक्षपूर्वक जोडावे. सर्व कागदपत्रांसह अर्ज संबंधित कार्यालयात जाऊन जमा करावा. त्यानंतर अधिकारी या अर्जाची तपासणी करतील. त्यानंतर योजनेसाठी पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन मिळू शकेल. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. या योजनेविषयी ग्रामपंचायत, पंचायत समितीत, जिल्हा परिषद मध्ये जाऊनही माहिती करून घ्यावी.

Advertisement

आवश्यक कागदपत्रे: अर्जासोबत आधार कार्ड, ओळखपत्र, जन्मदाखला, आयकर प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर त्याचे प्रमाणपत्र, शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो असणे गरजेचे आहे. ही योजना महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगढ, बिहार या राज्यांसाठी लागू आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement