SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

“माझा भाऊ उपाशी राहील”, रस्त्यावर अर्ध्या रात्री धावणाऱ्या ‘त्या’ जिद्दी मुलाचा व्हिडीओ व्हायरल..

सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मुळे आपल्याला एक ना एक व्हायरल गोष्टी, चर्चात्मक गोष्टी कळतात. आता एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात एका मुलाच्या जिद्दीचं उदाहरण पाहायला मिळत आहे आणि आयुष्याशी संघर्ष कसा करायचा यावर उत्तर म्हणजे त्याचं हसू हेच खूप काही सांगून जातंय. चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी रविवारी संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

व्हीडिओमध्ये नेमकं काय आहे ?

Advertisement

कमी वयात जबाबदारी आणि स्वप्नांचा समतोल राखून आयुष्य प्रामाणिकपणाने घालवणाऱ्या एका 19 वर्षांच्या मुलाला पाहून आपल्या चेहऱ्यावर नक्कीच स्मित हास्य उमटेल. कारण या व्हिडीओमध्ये गोष्टही अशीच आहे.

झालं असं की, चित्रपट निर्माते विनोद कापरी रात्री कारमधून जात असताना त्यांची नजर एका खांद्यावर बॅग घेऊन धावत असलेल्या मुलावर पडली. हा मुलगा आपल्या पाठीवर एक बॅग घेऊन अर्ध्या रात्री धावत होता. विशेष म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि तो अर्ध्या रात्री असा पळत असल्याने काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून विनोद कापरी त्याला लिफ्ट ऑफर करतात, परंतु वारंवार विनंती करूनही तो मुलगा लिफ्ट नाकारतो. हे थोडंसं वेगळं वाटल्याने ते त्याला आणखी विनंती करतात.

Advertisement

या मुलाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहूनच कल्पना येईल की कष्टाची त्याला किती किंमत आहे. रस्त्यावर धावणाऱ्या या मुलाचं नाव प्रदीप मेहरा (Pradeep Mehara Viral Video) असं आहे, ते तो स्वतः सांगतो. त्याची आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. प्रदीप 10 किलोमीटर धावत सुटलाय. रात्रीचे बारा वाजलेत. दहा किलोमीटर धाऊन तो घरी जाणार मग त्यानंतर जेवण बनवणार आणि मग तो ते खाणार”, असं सांगतो.

पुढे असं होतं की, इतक्या रात्री हा मुलगा आपल्या धावत जाण्यावरच ठाम असतो आणि गाडीत बसायला तो नकारच देत राहतो. गाडीत बसायला नकार देणाऱ्या या मुलाशी तसाच पुढे संवाद सुरु राहतो. तो सांगतो की, त्याला आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे. त्यासाठी तो धावण्याची प्रॅक्टिस करत असल्याचं सांगतो. घरी जाऊन जेवण करणार कधी, तो ते खाणार कधी म्हणून त्याला जेवणाची ऑफर देतात. पण त्यावर “जर मी तुमच्याबरोबर जेवलो तर घरी माझा मोठा भाऊ उपाशी राहील”, असं उत्तर देतो. किती ही जिद्द आणि केवढे त्याचे कष्ट..!

Advertisement

पाहा काळजाला भिडणारा व्हिडीओ : 

Advertisement

 

व्हिडीओ व्हायरल करण्याबाबत तो स्वतः म्हणाला..

Advertisement

विनोद कापरी यांनी प्रदीपला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणार असल्याचं सांगितलं आणि हा व्हिडीओ लवकरच व्हायरल होणार असल्याचंही सांगितले. यावर प्रदीप हसतो आणि म्हणतो “मला कोण ओळखेल? व्हिडीओ व्हायरल झाला तरी काय होणार आहे कारण मी काहीच चुकीचं करत नाहीये”, असं म्हणत तो आपल्या भूमिकेवर ठाम राहतो.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement