SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

त्याने मला करायला लावली नको ‘ती’ गोष्ट; ‘त्या’ अभिनेत्रीने The Kashmir Files च्या विवेक अग्निहोत्रीवर लावले गंभीर आरोप

मुंबई :

The Kashmir Files चे निर्माता आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सध्या चर्चेत असणारे नाव आहे. या चित्रपटामुळे लोकांनी त्यांना अक्षरशः देवाची उपमा दिली आहे. मात्र हेच विवेक अग्निहोत्री यापूर्वी अनेकदा विविध वादात सापडलेले आहेत. सध्या त्यांच्यावर एका बॉलीवूड अभिनेत्रीने केलेले लैंगिक तक्रारीचे आरोप पुन्हा एकदा व्हायरल होताना दिसत आहेत.

Advertisement

या वर्षाच्या सुरूवातीला मिस इंडिया आणि अभिनेत्री तनुश्री दत्ताने The Kashmir Files चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीविरोधात FIR दाखल केली असल्याचं समजत आहे. एका चित्रपटादरम्यान विवेक अग्निहोत्रीनं गरज नसतानाही आपल्याला कपडे उतरवायला सांगितले असा गंभीर आरोप महिन्याभरापूर्वी अभिनेत्री तनुश्रीनं केला होता. विवेक अग्निहोत्रीनं आपल्यावर असलेले गैरवर्तणुकीचे आरोप मान्य केल्यानंतरच तिनं तक्रार दाखल केल्याचं म्हटलं जात आहे.

या वर्षाच्या सुरूवातीला तनुश्री दत्ता हिने विवेक अग्निहोत्री यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तिने खुलासा केला होता की,  2005 मध्ये ‘चॉकलेट : डिप डार्क सिक्रेट’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विवेक यांनी तिला कपडे काढून डान्स करायला सांगितलं होतं. मात्र, विवेक यांनी हे आरोप ठामपणे फेटाळून लावले होते. हे खोटं असल्याचं सांगत त्यांनी अभिनेत्रीवर मानहानीचा खटला दाखल केला.

Advertisement

‘चित्रीकरणादरम्यान तनुश्रीचा गैरसमज झालेला. तिला कोणीही कपडे काढायला सांगितले नव्हते. 200 लोक सेटवर असताना असं सांगण्याची हिंमत तरी कोण करेल का?’, असा प्रश्न याच चित्रपटाच्या सेटवर कायम उपस्थित असलेले सहाय्यक दिग्दर्शक गझमेर यांनी केला आहे.

तनुश्रीनं यापूर्वी नाना पाटेकर, राकेश सारंग, सामी सिद्धीकी आणि गणेश आचार्य यांच्याविरोधातही तक्रार दाखल केली होती. नाना पाटेकर यांच्यावरही तनुश्रीनं लैंगिक गैरवर्तणुकीसारखे गंभीर आरोप केले होते.

Advertisement