SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उन्हाळ्यात कमी पाणी पिताय..? आरोग्याबाबत ‘या’ समस्या उद्भवण्याचा धोका..!

ऋतुमानानुसार आपल्या शरीराची पाण्याची गरज बदलत असते.. आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून, या दिवसांत आजारांना दूर ठेवायचे असेल, तर सातत्याने पाणी पिण्याची गरज आहे. शरीरासाठी पाणी (Water) अतिशय महत्त्वाचा घटक आहे. शरीराच्या एकूण वजनात 60-70 टक्के वाटा पाण्याचा असतो.

पाण्यामुळं शरीरातील अनेक अवयवांचं कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत होते. म्हणूनच निरोगी शरीरासाठी पाणी अतिशय महत्त्वाचं समजल जातं.  उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने कोणत्या समस्यांना सामाेरे जावे लागू शकते, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

आरोग्यावर होणारा परिणाम

बद्धकोष्ठता : कमी पाणी प्यायल्याने अनेकदा बद्धकोष्ठतेसारखा गंभीर आजार उद्भवू शकतो.. त्यावर वेळीच उपचार न केल्यास, त्यातून मूळव्याधीसारख्या आणखी गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते.

Advertisement

निस्तेज त्वचा : शरीरात कमी प्रमाणात पाणी असल्यास त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा राहत नाही व त्वचा निस्तेज दिसते. सोबतच मुरुम, पिंपल्स येऊ लागतात. त्वचा रुक्ष होते.

किडनीच्या समस्या : कमी पाणी प्यायल्याने किडनीवर वाईट परिणाम होतो. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम किडनी करीत असते, पण कमी पाण्यामुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

Advertisement

ऊर्जा कमी : शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, ऊर्जा अधिक खर्च होते. त्यातून लवकर थकवा येतो. त्यामुळे उन्हाळ्यात योग्य आहारासोबतच पाणी पिणं गरजेचं आहे.

टीप : वरील लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement