SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

देशात कोसळणार मोठे संकट; महाराष्ट्राच्या कोणत्या भागांना बसणार फटका; वाचा सविस्तर

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. असानी नावाचं हे चक्रिवादळ अंदमान निकोबारच्या बाजूने म्यानमारच्या दिशेने जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अंदमान आणि निकोबार भागात आलेलं असनी चक्रीवादळ देशाला झटका देणार असल्याचे अंदाज समोर आलेले आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गेल्या 2 दिवसात पाऊस झालेला आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रात वातावरणात मोठे बदल दिसून आलेले आहेत.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोकणात असनी चक्रीवादळाचा धोका असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र कोकणाला चक्रीवादळाचा धोका नसल्याचे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. येत्या दोन-चार दिवसांत कोकणाला चक्रीवादळाचा धोका आहे, अशी चर्चा आहे. मात्र, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.

Advertisement

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो. तर या वादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झालं असून आंबा आणि काजू पिकांना याचा फटका बसू शकतो.

या चक्रीवादळाचा परिणाम दक्षिण भारतात होणार आहे. केरळ, तमिळनाडू, पदुचेरी कर्नाटका राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा आहे. दुसरीकडे लडाख-जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांना याचा फटका बसू शकतो. या चक्रीवादळी मुळे मच्छीमारांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Advertisement