SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): जीवनासाथी चांगली साथ देईल. नोकरीत अडचणींना तोंड द्यावे लागेल. काहींना मनाविरुद्ध बदलीला सामोरे जावे लागेल. सहकाऱ्यांशी जुळवून घेतलेले बरे राहिल. तुम्ही योग्य वेळी परिस्थिती हाताळली नाहीत तर वाद होऊ शकतात. सार्वजनिक क्षेत्रात व्यवहार करणाऱ्यांनी गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी जपून, काळजीपूर्वक वापरण्याची गरज आहे.

वृषभ (Taurus): तुमचा हेतू चांगला असला तरी तुमची संवाद साधण्याची पद्धत सुधारण्याची गरज आहे. तुम्ही योग्य वेळी परिस्थिती हाताळली नाहीत तर वाद होऊ शकतात. कार्यक्षेत्रातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती भेटेल, जिचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरेल. गेल्या काही दिवसांपासून होत असलेली चिडचिड आता उरणार नाही. बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी सावधानता बाळगा.

मिथुन (Gemini) : इतरांचे कौतुक कराल. गोड बोलण्यावर भर द्याल. दिवस घरातील कामात व्यतीत होईल. मजेत प्रवास कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. तुमच्या मताचा आदर केला जाईल. प्रवासात काळजी घ्यावी. कामाची तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. स्वकष्टावर कामे करण्याकडे कल राहील. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.

कर्क (Cancer) : धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जवळचा प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होईल. व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहिल. मात्र, एखादा मोठा निर्णय चुकूही शकतो. संयमाने वागण्याची गरज आहे. नोकरीत वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. जबाबदारी वाढेल. तुमचा मूड सतत बदलत राहील.

Advertisementसिंह (Leo) : अनाठायी हस्तक्षेपामुळे लाभाचा मार्ग प्रभावित होईल. आज तुम्हाला अनोळखी व्यक्तींची साथ मिळू शकते. कठोर परिश्रम आवश्यक आहेत. भागीदारीत अधिक लक्ष घालावे. नवीन वस्त्र खरेदी कराल. कामाचे योग्य नियोजन करावे. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील. अवाजवी खर्च टाळा.

कन्या (Virgo) : तुमच्यासाठी सक्रिय असलेले विरोधकही पराभूत होतील. बांधकामाची गरज भासणार आहे. काही चांगल्या बातम्यांमुळे तुमचा उत्साह वाढेल. दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. चांगले औद्योगिक वातावरण लाभेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. जोडीदारसंबंधित तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. घरात काही विशेष पूजा करा.

तुळ (Libra) : काही आर्थिक आणि कौटुंबिक अडथळे तुमच्यावर दबाव आणतील. खूप उत्साह आणि तत्परता काम खराब करू शकते. मानसिक दोलायमानता जाणवेल. लिखाणात चांगली प्रगती करता येईल. दिवस काहीसा आळसात जाईल. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल. गुरु जप करणं योग्य ठरेल.

वृश्‍चिक (Scorpio) : चांगले संदेशही येतील आणि जुने मित्र भेटतील. अनावश्यक शंका टाळा. चुकीच्या मार्गाने पैसे कमवू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जोडीदाराच्या स्वभावाची नवीन बाजू लक्षात येईल. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. राजकीय व्यक्तींना विशेष लाभ होतील. व्यापारात मोठी प्रगती होईल. अनेक लाभ होतील. हातात पैसा खेळता राहील.

Advertisementधनु (Sagittarius) : कौटुंबिक विषमता डोके वर काढू शकते. मान-सन्मानही वाढेल आणि अनपेक्षित लाभही मिळतील. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. नातेवाईकांची मदत घेता येईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आबालवृद्ध तसेच आजारी व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. एखाद्या वादात पडू नका. भाग्यशाली दिवस. ताण कमी होईल.

मकर (Capricorn) : आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. तुम्ही केलेल्या कामाला विरोध होईल. कौटुंबिक समस्यांबाबत कोणताही चुकीचा निर्णय घेणे कठीण होईल. उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. नोकरांचे सुख चांगले राहील. निराकरण होईल. धन आगमन होईल. मिटिंग चांगली राहील. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. आज काहीसा थकवा येईल.

कुंभ (Aquarious) : कठोर परिश्रमानंतर अपेक्षित लाभ होईल. तुम्हाला दूरचा प्रवासही करावा लागू शकतो. मानसिक समस्यांमुळे मन निराश राहील. जोडीदाराची कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. आकर्षणाला बळी पडू नका. मीडिया तसेच आयटीशी संबंधित व्यक्ती आपल्या कामाने संतुष्ट असतील. भावंडं मदत करतील. मुलांची अवाजवी चिंता करू नका. महिलांना धावपळ करावी लागेल.

मीन (Pisces) : काही अपूर्ण कामे मार्गी लावावी लागतील. सुख आणि दु:ख समान मानून सर्व काही नशिबावर सोडा. पैज जिंकता येईल. धाडसाने कामे हाती घ्याल. मुलांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. दिवस तुमच्यासाठी प्रसन्नता वाढवणारा असेल. आज दिवस फारसा अनुकूल नाही. विचित्र अशी हुरहूर जाणवेल. खर्च होईल.

Advertisement