SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आरसीएफ’मध्ये बंपर भरती..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईतील राष्ट्रीय केमिकल व फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Mumbai) विविध पदांसाठी नोकर भरती केली जात आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे..

राष्ट्रीय केमिकल व फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये किती पदांसाठी भरती होत आहे. त्यासाठी पात्रता काय, अर्ज कुठे व कधीपर्यंत करायचा, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 137

या पदांसाठी भरती
– ऑपरेटर- केमिकल ट्रेनी (Operator Chemical Trainee)
– ज्युनियर फायरमन- ग्रेड II (Junior Fireman – Grade II)

Advertisement

शैक्षणिक पात्रता
ऑपरेटर केमिकल ट्रेनी (Operator Chemical Trainee) – ‘बीएस्सी’च्या भौतिकशास्त्रासह यूजीसी/एआयसीटीई मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून उत्तीर्ण, नियमित बीएस्सी (रसायनशास्त्र) पदवी. नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) परीक्षा पदवी उत्तीर्ण असावा. तसेच किमान तीन वर्षांचा अनुभव.

ज्युनियर फायरमन- ग्रेड II (Junior Fireman – Grade II) – उमेदवार दहावी उत्तीर्ण,  फायरमॅनचे एक वर्षांचं सर्टिफिकेट, किमान एक वर्षाचा अनुभव.

Advertisement

आवश्यक कागदपत्रं
– 
Resume (बायोडेटा)
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (राखीव उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2022

Advertisement

येथे करा ऑनलाईन अप्लाय – https://www.rcfltd.com/hrrecruitment/recruitment-1

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा https://drive.google.com/file/d/1Ue7aCBKcANP0KX0LQN_4cvtMYYRd2uYj/view

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement