SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शरद पवारांचे मोठे विधान : आमच्यासाठी ‘त्या’ पक्षाचा विषय संपला

मुंबई :

एआयएमआयने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi – MVA) येण्याची ऑफर दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच वातावरण तापलं आहे. काल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM Imtiaz Jalil) आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) बैठक झाली होती. त्यानंतर या चर्चेला उधान आले. अशातच आता यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Advertisement

बारामती येथे पवारांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत असताना आपली व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पवार यांनी MIM सह एकत्र येण्याच्या प्रस्तावावर एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. पुढे बोलताना पवार म्हणाले की, कोणी कोणत्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: सांगू शकतात. मात्र ज्यांच्या सोबत जायचे आहे, त्या पक्षांनी तर होय म्हटले पाहिजे.

पुढे बोलताना पवारांनी स्पष्ट केले की,  हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता कोणी प्रस्तावित केला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारच्या राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही.

Advertisement

तुमच्या तीन चाकी रिक्षाला आमचेही एक चाक जोडून द्या. मोटर कार करा आणि बघा ती कशी चालते… आमचे तर स्पष्ट मत आहे. भाजप देशासाठी खूप घातक ठरत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमची कोणत्याही पक्षासोबत जाण्याची तयारी आहे, असे म्हणत काल जलील यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली होती.

Advertisement