SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आमदार तर फुटणारच’ म्हणत रावसाहेब दानवेंनी केला आणखी एक धक्कादायक खुलासा; महाविकास आघाडीच्या गोटात उडाली खळबळ

जालना :

राज्यात आगामी निवडणुकांमुळे आधीच वातावरण तापलं असताना काल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) 25 आमदार हे अद्यापही भाजपच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला होता. यानंतर आता त्यांनी त्यापेक्षाही धक्कादायक खुलासा केला आहे.

Advertisement

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये सत्यता आहे. पेन ड्राइवमध्ये सत्यता नव्हती तर मग अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला? आगामी काळात आम्ही आणखी चार पेनड्राइव्ह बाहेर काढू,’ असे म्हणत दानवे यांनी महाविकास आघाडीच्या गटात खळबळ उडवली आहे.

हे पेनड्राइव्ह नेमके काय उघड करतील, याबाबत त्यांनी जास्त सांगितले नाही. आमदारांविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील काही आमदारांनी आमच्याकडे सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी कधीतरी उफाळून येणार आहे.

Advertisement

ते बंड करतीलच, फक्त योग्य वेळ आल्यावर ते सर्वांसमोर येतील. जे आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं आता सांगू शकत नाही. कारण, त्यांची आमदारकी धोक्यात येईल, असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले. दानवे यांना प्रत्युत्तर देताना काल मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी भाजपच्या आमदारांना मोठा निधी दिला. फडणवीस यांनी जितका निधी दिला त्याच्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिला आहे. तसे फोन करुन भाजप आमदार आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे आमचे आमदार फुटणे शक्य नाही. जर फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही.

Advertisement