SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘त्या’बाबत ICCनं दिला धक्कादायक निर्णय; होणार मोठी कारवाई

बंगळुरु :

बंगळुरुतल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chennamma Stadium) 12 तारखेला भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला होता. विशेष बाब म्हणजे हे स्टेडियम विराट कोहलीचे होम पीच आहे. अशा या स्टेडियम बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement

आता या सामन्याच्या खेळपट्टीबाबत आयसीसीकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी सरासरीपेक्षा वाईट असल्याचे आयसीसी सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी म्हटले आहे आणि या खेळपट्टीला एक डिमेरिट गुण दिला आहे.

याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, पहिल्या दिवशीच खेळपट्टीवर चेंडूला खूप वळण मिळत होते. हे प्रत्येक सत्रात दिसत होते, पण माझ्या मते फलंदाजी आणि गोलंदाजीत समान लढत दिसली नाही, त्यामुळे आयसीसी मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेता मी ही खेळपट्टी सरासरीपेक्षा वाईट असल्याचे मानतो.

Advertisement

सुधारित आयसीसी खेळपट्ट्या आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंग प्रक्रियेनुसार, ज्या ठिकाणच्या खेळपट्ट्यांना सामनाधिकार्‍यांनी सरासरीपेक्षा कमी रेट केले आहे त्यांना एक डिमेरिट पॉइंट मिळतो, तर ज्या खेळपट्ट्यांना अनुक्रमे तीन आणि पाच डिमेरिट गुण दिले जातात, त्यांना खराब आणि अयोग्य म्हणून चिन्हांकित केले जाते.

Advertisement