SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चेन्नईचे वाढले टेन्शन, ‘त्या’ खेळाडूला मिळेना व्हिसा; ‘असा’ होऊ शकतो बल्ल्या

सुरत :

लवकरच आता क्रिकेटप्रेमींना आपल्या आवडत्या आयपीएलचे विविध सामने पाहता येणार आहेत. पुढच्या काही दिवसात आयपीएलचा नवा हंगाम सुरु होणार आहे. येत्या 26 मार्चला पहिला सामना संध्याकाळी 7:30 ला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. हा सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. पूर्ण तयारी झालेली असली तरीही चेन्नई सुपरकिंग्स संघाचे एका वेगळ्याच कारणाने टेन्शन वाढलेले आहे.

Advertisement

हा सामना अवघ्या 6 दिवसावर आलेला आहे आणि संघाचा स्टार खेळाडू मोईन अलीमुळे संघाचा मोठा बल्ल्या होऊ शकतो. कारण अद्यापही मोईन अली याला तब्बल 3 आठवडे प्रयत्न करूनही व्हिसा मिळालेला नाही. अवघे 6 दिवस बाकी असताना आता व्हिसा कधी मिळणार, याचेही मग त्यानंतर कसे नियोजन होणार, असे अनेक प्रश्न समोर आहेत.

नियमितपणे भारतात ये-जा असूनही मोईनला अद्याप व्हिसा का मिळालेला नाही, हेही एक कोडे आहे. मोईनने दिलेल्या माहितीनुसार, कागदपत्रे मिळताच मी पुढच्या विमानाने भारतात दाखल होईन. बीसीसीआय या प्रकरणी आमची मदत करत आहे. आशा आहे की सोमवारी 21 मार्चपर्यंत कागदपत्रे मिळतील.

Advertisement

मोईनने २८ फेब्रुवारी रोजी व्हिसासाठी अर्ज केला होता. हा अर्ज करून आता 2o दिवस झाले आहेत. तो नियमीतपणे भारतात येतोय, तरी देखील त्याला आता परवानगी मिळाली नाही. आम्हाला आशा आहे की तो लवकर संघासोबत जोडला जाईल, अशी माहिती चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी दिली.

मोईन अलीने आपल्या अष्टपैलू कामगिरीने चेन्नईच्या चौथ्या विजेतेपदात मोलाची भूमिका बजावली होती. 15 सामन्यात 357 धावा करण्यासोबतच त्याने 6 विकेट्सही घेतल्या. हे देखील कारण होते की टीम फ्रँचायझीने त्याला आयपीएल 2022 साठी 8 कोटींमध्ये कायम ठेवले होते. आयपीएलच्या सर्व 15 सामन्यांमध्ये त्याने 666 धावा केल्या आहेत. तसेच 16 विकेट्स घेतल्या आहेत.

Advertisement