SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बंगालच्या उपसागरात ‘असानी’ चक्रीवादळ, महाराष्ट्रावर होणार गंभीर परिणाम..!

सध्या आग्नेय बंगालचा उपसागर व दक्षिण अंदमान समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत हवेच्या या कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘असानी’ चक्रीवादळात (Asani Cyclone) रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

भारतीय किनारपट्टीला ‘असानी’ चक्रीवादळाचा कोणताही धोका नाही. येत्या मंगळवारी (ता. 22) बांग्लादेश – उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीला ‘असानी’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. भारतीय समुद्रात चक्रीवादळ घोंगावत असताना, महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Advertisement

विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणासह दक्षिण-मध्य महाराष्ट्रात आज (रविवारी) काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Advertisement

हवामान खात्याने जारी केलेल्या ‘सॅटेलाइट’ इमेजनुसार, महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे दाट ढग आढळले आहेत. त्यामुळे येत्या काही तासात याठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, केरळ व तमिळनाडूमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.

सांगली जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, पुण्यासह सातारा व घाट परिसरातही सरी कोसळू शकतात. विदर्भासह महाराष्ट्रातील विविध भागांत पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement