SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या स्वप्नात दिसणाऱ्या ‘या’ गोष्टींचा अर्थ काय? काय सांगतंय स्वप्नशास्त्र, जाणून घ्या..

दररोज रात्री झोपल्यावर आपण काही ना काही स्वप्नं पाहत असतो. काहींच्या स्वप्नांत प्राणी येतात, काहींच्या पैसे, अपघात, मंदिरे, कधी कधी घरातील एखादी व्यक्ती जी तुम्हाला सोडून गेली असेल, असं बरच काही त्यात असतं. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही स्वप्नं पडतात. काही आनंद देणारी असतात तर काही कल्पनेच्याही बाहेर असतात. स्वप्नातून जागं झाल्यावर आपण त्याचा विचार करू लागतो की, नेमकं काय स्वप्न पडलं होतं आणि जरी ते आठवलं तर ते अर्धवटच राहून जातं. पण कधी कधी असाही विचार करतो की खरंच स्वप्नात जे झालं ते पुन्हा झालं तर काय होईल?

उन्हाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्याल; जाणून घ्या सविस्तर

Advertisement

तुम्ही पाहिलेल्या अनेक स्वप्नांपैकी बरीच स्वप्नं तुम्हाला कधीकधी अनेक प्रश्नाचं उत्तर देऊन देतात, भविष्यात होणाऱ्या काही घटनांचा उल्लेख करून जातात आणि काही सूचना देत असतात. अशा काही सूचनांबद्दल स्वप्नशास्त्र माहिती सांगतं. वास्तविक जीवनात तुम्हाला पडलेल्या प्रत्येक स्वप्नाचा परिणाम हा वेगळा असतो किंवा तसं काही घडतंच नसतं. पण काही स्वप्नं अशी असतात की, धनाच्या आगमनाचे, चाहुलीचे, संकटांचे, सुखाचे संकेत देतात. जाणून घेऊया अशाच काही स्वप्नांबद्दल…

स्वप्नात देव किंवा मंदिर दिसणे: स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात देव किंवा मंदिर दिसलं तर असे स्वप्न शुभ मानले जाते. त्यावरून तुम्हाला भविष्यात पैसे मिळणार आहे, असे ते संकेत असतात. त्यामुळे तुम्ही कोणतेही काम करताना त्या कामात जास्त कष्ट न घेता यश मिळणे निश्चित असेल. तुम्हाला कोणत्याही कामात उत्तम यश मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. धनाची देवता कुबेर तुमच्यावर कृपा करणार आहे, असा अर्थ होतो.

Advertisement

स्वप्नात घोड्यावर स्वार होणे: जर तूम्हाला कधी असं स्वप्न पडलं तर, जर का तुमच्या स्वप्नात घोडा आला आणि तुम्ही त्यावर स्वतःला स्वार होताना पाहत आहात. स्वप्नात घोड्यावर स्वार होताना पाहणे हे देखील लाभाचे संकेत आहेत. एवढंच नाही तर हे स्वप्न तुम्हाला नवीन काम मिळण्याचे संकेत देते. स्वप्नात हत्ती पाहणे देखील शुभ मानले जाते. तुम्हाला काही स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात किंवा तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते, असा त्याचा अर्थ होतो.

डाळिंब खाणे, धान्य दिसणे: आजकाल कोरोनामुळे आरोग्याचं महत्व अधिक वाढलं आहे. आता लोक बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष दयायला लागले आहेत आणि विशेष काळजी घेतात. असंच काही जणांचं जास्त लक्ष खाण्याकडेही असते. जर तुम्हाला फळे खाण्याची आवड असेल तर स्वप्नात डाळिंब खाताना दिसले तर पैसे मिळतात, असं स्वप्नशास्त्र सांगत. स्वप्नात काजू, बदाम, अक्रोड खाणे किंवा वाटणे शुभ आहे. हे स्वप्न आर्थिक स्थिती सुधारण्याचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे स्वप्नात स्वतःला दही किंवा सुपारी खाताना पाहणे भविष्यात काही कामात यश मिळणार आहे हे दर्शवते. स्वप्नात धान्याचा ढीग पाहणे हे देखील खूप शुभ असते. यामुळे लक्ष्मीप्राप्ती होते, असं आपण अनेकदा ऐकलंही असेल.

Advertisement

स्वप्नात पैशाचे व्यवहार पाहणे: पैसे म्हटलं तर व्यवहार वेळेवर पूर्ण होणं गरजेचं आहे, हे आपल्याला माहितच असत. तुम्ही दिवसरात्र पैशाच्या मागे लागत असाल, तर विचार करून करून तुम्हाला स्वप्नंही तसेच पडतात, ज्यात तुम्ही कोणासोबतही पैशाचा व्यवहार करताना स्वतःला पाहतात. जर तुम्ही तुमच्या स्वप्नात स्वतःला पैशाचे व्यवहार करताना पाहिलं तर याचा अर्थ असा आहे की येत्या काही दिवसात तुम्हाला पैसे मिळणार आहेत. स्वप्नात शेतकरी दिसणे हे कष्टाचे आणि धनप्राप्तीचे तसेच सुखाचे लक्षण आहे. यासोबतच स्वप्नात आजूबाजूला हिरवळ दिसणे हे देखील लक्ष्मी येण्याचे प्रतीक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement