SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): प्रत्येक गोष्टीत समाधान मानाल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. आनंदाने एकमेकांना मदत कराल. घरात टापटीप ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.दिवस चांगला आहे. अनेक कामं होतील. अडचणी दूर होतील. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. त्यामुळे, माहितगाराचा सल्ला घेतलेला बरा. खाण्या-पिण्याची चंगळ राहिल.

वृषभ (Taurus): मानाने कामे कराल. चांगला आर्थिक लाभ होईल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. योग्य कागदपत्रे सादर करावीत. नियम-कायदे पाळणे हिताचे तसेच वाद टाळणे लाभाचे. शब्द जपून वापरणे फायद्याचे. दिवस प्रगतीचा. नियोजनाच्या जोरावर प्रगती कराल. आपण थोडे संयमाने वागा. जोडीदार आपल्याला साथ देईल. बोलण्यातून कामे मिळवाल.

मिथुन (Gemini) : इतरांची मने जिंकून घेता येतील. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यापरिवर्गाला दिवस चांगला जाईल.माणसं ओळखायला शिका. शब्द जपून वापरणे हिताचे. नियोजन महत्त्वाचे हे लक्षात ठेवा. हुशारीने वागाल तर यशस्वी व्हाल. सकल हलका आहार घेतला पाहिजे. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. श्रम वाढतील.

कर्क (Cancer) : कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. लहान प्रवास कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. मनाची विशालता दाखवाल. धार्मिक भावना जोपासाल. नेतृत्वाची संधी मिळेल. जबाबदारीने कामं करा. नियोजन हिताचे. कायदे पाळणे लाभाचे. वाद टाळणे फायद्याचे. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय यश मिळेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. वाहने जपून चालवा. घाईघाईत कामे करू नका.

Advertisementसिंह (Leo) : गोड बोलून कामे मिळवाल. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. फोटोग्राफीची हौस पूर्ण करता येईल. नियोजन करणे हिताचे. प्रयत्नांमध्ये सातत्य राखणे हिताचे. तज्ज्ञांचा सल्ल्याचा लाभाचा. लोकांवर प्रभाव पाडू शकाल.नोकरीत काही अडचणी येतील, त्या संयमाने सोडवा. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. प्रवास शक्यतो टाळा.

कन्या (Virgo) : आपले विचार उत्कृष्ठपणे मांडाल. हसत हसत कामे पूर्ण कराल. बौद्धिक चलाखी वापराल. योग्य तर्क वापराल. कला क्षेत्रातील लोकांची प्रगती होईल. मनपसंत कामं आवडीने करता येतील. दिवस आनंदात जाईल. वेळेचे आणि कामाचे नियोजन लाभाचे.आरोग्याची काळजी घ्या, बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणे टाळा. अडचणी दूर होतील. रहदारीचे नियम पाळा.

तुळ (Libra) : फार काळजी करू नये. काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. ऐशारामाच्या वस्तूंची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सामाजिक बांधिलकी जपाल. हुशारीने मार्ग काढाल. माणसं जोडणं हिताचं. योग्यवेळी योग्य व्यक्तींची साथ घेणं हिताचं. महत्त्वाची कामं होतील. वाद टाळणं आणि शब्द जपून वापरणं हिताचं. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.

वृश्‍चिक (Scorpio) : मोठ्या लोकांत उठबस वाढेल. जवळचे मित्र भेटतील. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल. कामाची धावपळ वाढेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.आत्मनिर्भर व्हा. बदल स्वीकारा. परिस्थितीशी हुशारीने जुळवून घ्याल. दिवस चांगला जाईल. जोडीदाराची चांगली साथ राहिल, थोडं क्रोधाला आवर घातली पाहिजे. नोकरीत वादाचे प्रसंग येतील.

Advertisementधनु (Sagittarius) : मानापमानाच्या गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आर्थिक गुंतवणूक सावधगिरीने करावी. काही कामे अडकून पडतील. अनेक कामांसाठी लोकांचं सहकार्य लाभेल. दिवस चांगला जाईल. तरुणांनी चांगल्या मित्रासोबत राहावे, वेळ आणि पैसा खर्च करायला लावणाऱ्या मित्रांना दूर ठेवा. जीवनसाथी व घरातील इतरांच्या तब्येतीची काळजी घ्या.

मकर (Capricorn) : जवळच्या मित्रमंडळींशी गप्पांमध्ये रमून जाल. नवीन स्नेहसंबंध जोडले जातील. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. नियम-कायदे पाळा. वाद टाळा. जपून आर्थिक व्यवहार करा. आर्थिक नियोजन महत्त्वाचे. संमिश्र ग्रहमान अनुभवण्यास मिळेल. काहींना प्रवास करावा लागेल, प्रवासात काळजी घ्या. झोपेची तक्रार जाणवेल.

कुंभ (Aquarious) : मानसिक व्यग्रता जाणवेल. आपला ठसा उमटवाल. घरातील गोष्टी शांततेत हाताळाव्यात. वाहन विषयक कामे पार पडतील. जमिनीच्या कामात लक्ष घालाल. नव्या ओळखी होतील. अडचणी दूर करण्यासाठी ओळखीतील व्यक्तींची मदत घेणे हिताचे. आर्थिक नियोजन आणि कामाचे नियोजन लाभाचे. मनातील इच्छा पूर्ण होईल. लहानांशी मैत्री कराल.

मीन (Pisces) : आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदारा बरोबर गप्पा-गोष्टी कराल. पैज जिंकता येईल. कलेला पोषक वातावरण मिळेल. वास्तवाचे भान राखणे आणि व्यवहार जपणे महत्त्वाचे. विचारपूर्वक वर्तन करणे हिताचे. नियम-कायदे पाळणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. घरी पाहुणे येतील. आर्थिक आवक चांगली राहिल. मुलांच्या अडचणी समजून घ्या.

Advertisement