SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आला उन्हाळा.., उष्णतेपासून संरक्षणासाठी ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी..!

‘आला उन्हाळा- आरोग्य सांभाळा’ असं नेहमीच म्हटलं जातं.. कारण, ऋतू बदलानुसार वातावरणात बदल होतो नि हे बदल शरीराने न स्वीकारल्यास आजारी पडण्याची भीती असते..

आताच उन्हाचा पारा चाळीशी पार गेलाय. त्यात पुढील 3-4 दिवसांत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलीय. अशा वेळी नागरिकांनी आरोग्याबाबत काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

काय काळजी घ्याल..?
▪️ शरीर डिहायड्रेड होणार नाही, यासाठी भरपूर पाणी प्या, शिवाय ताक, नारळ पाणी, उसाचा रस, लस्सी, इलेक्ट्रोल पावडर घ्या. काकडी, गुलकंदही खाता येईल.
▪️ चहा, कॉफी, मद्यपान करू नका. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
▪️ वेळोवेळी चेहऱ्यावर गार पाणी मारा. उष्णतेचा त्रास होत असल्यास थंड पाण्याने अंघोळ करा. सनस्क्रीन वापरा.

▪️ हलके, सौम्य रंगाचे, कॉटनचे कपडे वापरल्यास फार त्रास होणार नाही.
▪️ शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नका. उन्हात फिरताना छत्री वापरा. सनकोट घाला.
▪️ जड, तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ खाऊ नका. हलका आहार घ्या.

Advertisement

👉🏻 टीप – वरील लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ‘स्प्रेड इट’ त्याची हमी देत नाही.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement