SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एकदा रिचार्ज केला तर वर्षभर नो टेन्शन! जिओचे धमाकेदार रिचार्ज प्लान्स कोणते..?

देशातील 4G आल्यानंतर अधिक नावाजलेली कंपनी Reliance Jio आपल्या ग्राहकांसाठी एकेक भारी ऑफर आणत आहे आणि काही स्वस्त प्लान्स ही कंपनी लाँच करत असते. जिओ व्यतिरिक्त इतर टेलिकॉम कंपन्या जसे की भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या तुलनेत या कंपनीकडे स्वस्त प्लान्सची भलीमोठी लिस्ट आहे.

जिओ कंपनीकडे एक वर्ष चालतील असे काही बेस्ट प्लान्स आहेत. आता नेहमीच ऑफर्सची बरसात करणाऱ्या या कंपनीने ग्राहकांसाठी आणखी दोन प्लान्स आणले आहेत. रिलायन्स जिओच्या या अनेक प्लान्सपैकी एका प्रीपेड प्लानची किंमत 2879 रुपये आणि दुसऱ्या प्लानची 2999 रुपये आहे. जर तुम्हाला नेहमी रिचार्ज करण्यासाठी कंटाळा येत असेल तर जास्त दिवसांची वैधता मिळविण्यासाठी हे प्लान्स उपयोगी ठरतील. या प्लान्समध्ये दररोज 2-2.5 जीबी हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळेल.

Advertisement

रिलायन्स जिओचा 2879 रुपयांचा प्लान:

Reliance Jio ने 2879 रुपये किंमतीचा जबरदस्त प्लान लाँच केला आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळेल. भारतातील प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच यूजरला 100 SMS देखील दररोज मिळतील. Jio च्या या Prepaid Plan ची वैधता 365 दिवस आहे. असे मिळून प्लानमध्ये एकूण 730 जीबी हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळेल. डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर 64 Kbps च्या स्पीडने इंटरनेट डेटाचा वापर करू शकता.

Advertisement

रिलायन्स जिओचा 2999 रुपयांचा प्लान:

रिलायन्स जिओने यूजर्ससाठी दुसरा प्लॅन आणला आहे, तो 2999 रुपयांचा आकर्षक प्लान आहे. जिओच्या या प्लानची वैधता 365 दिवस आहे, त्यात तुम्हाला दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळेल. सोबतच, कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळेल. यात तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस दिले जातात. हा प्लान 365 दिवस वैधतेचा येतो. यामध्ये एकूण 912.5 GB डेटाचा फायदा मिळेल. या दोन्ही प्लान्समध्ये यूजर्सला जास्त फायदा मिळतो. जिओ टीव्ही, जिओ सिनेमासह अन्य जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन अगदी फ्री मिळणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement