SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जगातील आनंदी देशांची यादी जाहीर, भारत कितव्या स्थानी..?

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी नुकतीच संयुक्त राष्ट्रांने जाहीर केलीय. या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देशाचा मान मिळाला आहे. अशी यादी जाहीर करण्याचे हे 10 वे वर्ष आहे.

वैयक्तिक समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा विविध घटकांच्या आधारे ही यादी तयार करण्यात आलीय. त्यात एकूण 146 देशांचे मूल्यमापन करण्यात आलं. विशेष म्हणजे, या यादीत युद्ध सुरू असलेल्या रशिया व युक्रेन अनुक्रमे 80 व 98व्या स्थानावर आहेत.

Advertisement

भारत कितव्या स्थानी..?
जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत भारताचं स्थान बरंच मागे आहे. 146 देशांच्या यादीत भारत थेट 136व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी भारत या यादीत 144व्या स्थानी हाेता.

‘टाॅप टेन’ देश

Advertisement
  1. फिनलँड
  2. डेन्मार्क
  3. आइसलँड
  4. स्वित्झर्लंड
  5. नेदरलँड
  6. लक्झेंम्बर्ग
  7. स्वीडन
  8. नॉर्वे
  9. इस्राईल
  10. न्यूझीलंड.

अफगाणिस्तान सर्वात दुखी
सर्वात दु:खी देश अफगाणिस्तान ठरलाय. हा देश आधीपासून तळाशी होता. त्यात तालिबानने तेथील सत्ता काबीज केल्यानंतर तेथे मानवी समस्यांनी उग्र रूप धारण केलंय. त्यानंतर लेबेनॉन आणि झिम्बाब्वे हे देश सर्वात कमी आनंदी ठरले आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या गटाकडून विशिष्ट पद्धतीचा अवलंब करुन ही यादी तयार करण्यात येते. दरवर्षीची यादी तयार करताना, प्रामुख्याने गेल्या तीन वर्षांतील परिस्थितीचा आढावा घेतला जातो. या निकषांवर देशांना 0 ते 10 दरम्यान मूल्यांकन दिलं जातं. त्यानंतर ही यादी तयार केली जाते..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement