SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: राज्यातील तरुण/तरुणींना रोजगार मिळणार, बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा, जाणून घ्या सविस्तर..

मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने चालू महिन्यातील 21 मार्च 2022 ते 28 मार्च 2022 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील अनेक बेरोजगार तरुण / तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे अनेकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील तरुण/तरुणींना रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत. रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या आणि सरकारच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहेत.

Advertisement

तसेच अनेक रोजगार मेळाव्याविषयी अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/sector या वेबसाईटला भेट द्या. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी व्यवस्थित माहिती वाचून वेबसाईटवरील अद्ययावत माहितीकडे लक्ष असू द्यावे. भविष्यात संबंधित वेबसाईटवर रिक्त पदांबद्दल अधिक माहिती घेऊन अर्ज करावा. या अनमोल संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात येत आहे.

नोकरीसाठी जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी अद्याप नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा ॲड्रॉईड मोबाईल धारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam App मोफत डाऊनलोड करून नोंदणी करावी. तसेच, लॉग-इन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावेत, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement