SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गॅस सबसिडीबाबत केंद्र सरकारचा नवा प्लॅन, आता कोणाला मिळणार अनुदान..?

महागाईचा कहर सुरु आहे.. पेट्राेल-डिझेलचे भाव गगणाला भिडलेत. त्यात गॅस दरवाढीची भर पडलीय.. गॅस सबसिडी बंद झाल्याने सर्वसामान्यांचा खिशा रिकामा होत आहे. ही गॅस सबसिडी कधी सुरु होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे क्रूड ऑईलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरही 1000 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अर्थात सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार, यापुढे ग्राहकांना एका सिलेंडरसाठी 1000 रुपये मोजावे लागू शकतात..

Advertisement

कधी मिळणार गॅस सबसिडी?
गॅसवर दिली जाणारी सबसिडी (LPG Subsidy) कधी सुरु होणार, असा सवाल ग्राहक उपस्थित करीत आहेत. मात्र, एलपीजी सिलेंडरबाबत केंद्र सरकारसमोर दोन पर्याय असल्याचे दिसते. एक तर सरकार सबसिडी कायमस्वरुपी बंद करु शकते किंवा दुसरे म्हणजे, काही निवडक ग्राहकांना सबसिडीचा लाभ दिला जाऊ शकतो.

गॅस सबसीडीबाबत सध्या तरी सरकारने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, वार्षिक 10 लाख रुपये इन्कमचा नियम लागू ठेवला जाईल. तसेच उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींना अनुदानाचा लाभ मिळेल नि इतर सगळ्याच लोकांची सबसिडी कायमची बंद केली जाईल.

Advertisement

सरकारचा अनुदानावरील खर्च
केंद्र सरकारने जानेवारी 2015 मध्ये सबसिडी देण्यास सुरुवात केली. त्यानुसार, ग्राहकांना पूर्ण पैसे भरुन सिलेंडर घ्यावा लागत होता. सरकारकडून सबसिडीचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यात रिफंड केले जात होतं. त्यानुसार केंद्र सरकारला 2020 मध्ये गॅस सबसिडीवर 24,468 कोटी रुपये खर्च आला, तर 2021 मध्ये हाच खर्च थेट 3,559 कोटी रुपयांवर आला.

गेल्या काही दिवसांत घरगुती गॅसचे दर स्थिर असले, तरी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइलने 19 किलो कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात नुकतीच 105 रुपयांनी वाढ केली. त्यामुळे 19 किलो गॅस सिलेंडरच्या दराने आता 2000 रुपयांचा आकडा ओलांडला आहे.

Advertisement

दरम्यान, सरकारी तेल कंपनी आयओसी (IOC) च्या https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या वेबसाइटवर घरगुती गॅस सिलेंडरचे दर तपासता येतात. येथे कंपन्या दर महिन्याला गॅसचे नवे दर जारी करीत असते.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement