SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 3 लाखांत मिळतेय ‘ही’ फॅमिली कार..! आकर्षक फीचर्स नि जबरदस्त मायलेज..!

जीवनात प्रत्येकाचंं कार खरेदी करण्याचं स्वप्न असतं. मात्र, बऱ्याच वेळा कारचा भार खिशाला पेलवणारा नसतो. कारण, सध्या बहुतांश कारच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. अशा वेळी अख्ख्या फॅमिलीसाठी लाखो रुपयांची मोठी कार कशी घेणार..? मात्र, चांगल्या मायलेजसह 7 सीटर कार फक्त अर्ध्या बजेटमध्ये मिळत असेल तर…

भारतात मोठ्या फॅमिलीसाठी ‘मल्टी पर्पज व्हेइकल्स’ (MPV) कारला सर्वाधिक डिमांड आहे. तुम्हीही अशीच एखादी स्वस्तात मस्त  7-सीटर कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे.

Advertisement

जपानची प्रमुख कार कंपनी ‘डॅट्सून’ (Datsun) कंपनी भारतात आपली सर्वात स्वस्त 7 सीटर कार ‘डॅट्सून गो प्लस’ (Datsun Go+) कारवर खास डिस्काउंट देत आहे. ‘मारुती सुझुकी’च्या ‘ईको व्हॅन’नंतर देशातील ही दुसरी सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे.

शो-रूममध्ये सध्या ही कार खरेदी केल्यास तुम्हाला 4.25 लाख ते 6.99 लाख रुपये लागतात, पण तुम्ही ही 7 सीटर कार अगदी कमी किमतीत घरी घेऊन जाऊ शकता. ऑनलाइन सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेबसाइट्सवर ‘डॅट्सून गो प्लस’ कारवरील ऑफर्स जाहीर केल्या आहेत. त्यातील सर्वोत्तम ऑफर्सबाबत पाहू या.

Advertisement

येथे मिळेल स्वस्त कार..
– ‘CARANDBIKE’ वेबसाइटवर सेकंड हॅण्ड कार विभागात 2015 मधील ‘डॅट्सून गो प्लस’ च्या मॉडेलची किंमत फक्त 2.55 लाख रुपये आहे.
– 2018 मधील या कारचे मॉडेल ‘CARWALE’ वेबसाइटवर पोस्ट केलंय. कोणत्याही ऑफरशिवाय 5.65 लाख रुपयांत येथे ही कार तुम्हाला मिळू शकते.
– तसेच ‘CARTRADE’ वेबसाइटवर या कारचे  2017 मॉडेल फक्त 3 लाख रुपयांत खरेदी करता येणार आहे.

‘डॅट्सून गो प्लस’ची वैशिष्ट्ये
या कारमध्ये कंपनीने 1198 सीसी इंजिन दिलेय, जे 1.2 लिटरचे इंजिन आहे. हे इंजिन 77 PS ची पॉवर व 104 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
– अँड्रॉइड ऑटो, अॅ्पल कार प्ले कनेक्टिव्हिटीसह 7 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एन्ट्री, मॅन्युअल एसी, हीटर, रिअर पार्किंग सेन्सर्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, पुढील सीटवर ड्युअल एअरबॅग्ज अशी फिचर्स मिळतात.
– ही कार 19.02 प्रति किलोमीटर मायलेज देते, जे ‘एआरएआय’ (ARAI)ने प्रमाणित केले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement