SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टी-20 वर्ल्ड कपआधीच भारत-पाकमध्ये रंगणार महामुकाबला, आशिया चषक स्पर्धेबाबत मोठी घोषणा..!

जगभरातील क्रिकेट रसिकांना कायम एका लढतीची उत्सुकता लागलेली असते, ती म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच.. दोन्ही देशांतील राजकीय संबंध ताणलेले असल्याने गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही संघांमध्ये मॅच होत नाहीत. ‘आयसीसी’च्या लढतीमध्येच हे दोन्ही संघ आमने-सामने येत असतात..

दरम्यान, भारत – पाक सामन्याची प्रतीक्षा असलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लवकर हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही देश या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत (ICC Men’s T20 World Cup 2022) भिडणार आहेत. मात्र, टी-20 वर्ल्ड कपपूर्वीही या दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे.

Advertisement

आशियाई क्रिकेट परिषदेने यंदाच्या आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाला शनिवारी (ता. 19) मान्यता दिली. त्यानुसार, 27 ऑगस्टपासून श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

श्रीलंकेत होणार आशिया चषक
गेल्या दोन वर्षांपासून आशिया चषकाचा गोंधळ सुरु होती. अखेर त्यावर शनिवारी तोडगा निघाला. 2020 मध्ये पाकिस्तानात ही स्पर्धा होणार होती, परंतु कोरोनामुळे ती एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. नंतर 2021 मध्येही ही स्पर्धा झालीच नाही. अखेर आता श्रीलंकेत टी – 20 फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली.

Advertisement

आशियाई क्रिकेट परिषदेची शनिवारी (ता. 19) वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यात औपचारिकपणे सहमती झाली. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून या स्पर्धेबाबत माहिती दिली. त्यानुसार येत्या 27 ऑगस्टपासून श्रीलंकेत स्पर्धा सुरू होईल, 11 सप्टेंबरला फायनल मॅच होणार आहे.

वास्तविक, आशिया चषक स्पर्धेचा फॉरमॅट आतापर्यंत एकदिवसीय होता. परंतु, यंदा ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यामुळे आशिया चषकही टी – 20 फॉरमॅटमध्ये खेळवण्याचा निर्णय झाला.

Advertisement

कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश व अफगाणिस्तान या संघांना या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे, तर सहावा संघ क्वालिफायर सामन्यांच्या आधारे निश्चित केला जाणार आहे. 20 ऑगस्टपासून क्वालिफायर सामने होणार आहेत.

1984 पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत 15 वेळा आशियाई संघांमध्ये ही स्पर्धा झालीय. त्यात भारताने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. भारतच या स्पर्धेचा सध्याचा चॅम्पियन आहे. टीम इंडियाने 2018 मध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले होते.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement