SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): सढळपणे इतरांना मदत कराल. गंभीरपणे विचार कराल. वैचारिक प्रौढता दाखवाल. नियोजन करून काम करत जा. कोणालाही बोल लावू नका आणि वाद टाळा. प्रयत्नात सातत्य राखल्यास यश मिळेल. जिभेवर गुळ आणि डोक्यावर बर्फ हवा हे लक्षात असू द्या. तुम्ही जे काम करू इच्छिता त्यासाठी आज जास्त कष्ट लागेल. तुमच्या वागण्याचा, बोलण्याचा इतर लोकांना राग येऊ शकतो.

वृषभ (Taurus): वागण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल. भावनाशीलतेने विचार कराल. जोडीदाराचे प्रेम सौख्य वाढेल.मनाला पटलेली कृती करा. ज्या कृतीमुळे स्वतःला अस्वस्थ वाटणार नाही ती कृती करायचा दिवस. चांगल्या कामांसाठी चांगला दिवस. तुमच्याकडे एखाद्याचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर तुम्हाला नवीन मार्ग शोधावे लागतील. सर्वांशी आदराने वागाल. आवडी-निवडीबाबत ठाम भूमिका घ्याल.

मिथुन (Gemini) : वरिष्ठांची मर्जी राखावी. चांगला दिवस आहे. हातून महत्त्वाचे काम होईल. इतरांच्या भल्याचा तसेच स्वतःच्या प्रगतीचा हुशारीने मेळ साधू शकाल. शब्दांचा विचारपूर्वक वापर करणे लाभाचे ठरेल. नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते, त्याचा पाठपुरावा केल्यास त्यातून एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना पुढे येऊ शकते. उपासनेला बळ मिळेल.

कर्क (Cancer) : घरातील कामात अधिक लक्ष घालावे. तुमचा रुबाब राहील. शिस्तीचा बडगा करू नका. प्रवासाचा आणि बाहेरचे खाण्याचा योग संभवतो. काहींबाबत परदेशी जाण्याचा योग आहे. खर्च वाढेल. धावपळ होईल. तब्येत जपा. वेळेचे भान राखा. आतापर्यंत ज्यांनी इतरांचं वर्चस्व सहन केलं आहे, ते आता आपल्या भूमिकेत बदल करण्यासाठी सक्रिय विचार करू शकतात.

Advertisementसिंह (Leo) : जोडीदाराचा विचार जाणून घ्याल. आळस झटका कामाला लागा. दिवस चांगला आहे. नियोजन करून काम करणे हिताचे. कामात माणसं जोडून त्यांची सोबत घेणे फायद्याचे. क्वचितप्रसंगी तुम्ही भावनाविवश व्हाल पण ते चांगलं असेल, कारण त्यामुळे तुमच्या मनात काय आहे ते समोरच्या व्यक्तीला नीट समजेल. योग्यप्रकारे आकलन करू शकाल. बोलण्यात माधुर्य ठेवाल.

कन्या (Virgo) : प्रवासाची हौस पूर्ण कराल. आनंददायी दृष्टकोन ठेवाल. प्रतिष्ठितांची साथ लाभेल. दिवस चांगला आहे. महत्त्वाची कामं होतील. कौतुक होईल. कायदे-नियम पाळणे लाभाचे. नवीन नोकरी शोधत असाल तर आता चांगल्या संधी मिळतील. नातेसंबंध देखील सुधारतील. दीर्घकाळ मनात घर करून राहिलेल्या भीतीवरही मात करता येईल. उत्कृष्ट काव्यस्फूर्ती लाभेल.

तुळ (Libra) : चांगले विवाह सुख लाभेल. क्षमता ओळखून वर्तन करा. अतिरेक टाळणे हिताचे. नियोजन लाभाचे. प्रसंगी तज्ज्ञांचे सहकार्य घ्या. वेळेला महत्त्व देणे हिताचे. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी नातं जोडण्याचा किंवा एखादी प्रगतीची संधी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी मनापासून कसून प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपल्याच मतावर आग्रही राहाल.

वृश्‍चिक (Scorpio) : जुगाराची आवड पूर्ण केली जाईल. मुलांच्या सहवासात रमाल. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल. इतरांवर बोलण्याचा प्रभाव पडेल. लोकांची मदत घेऊन महत्त्वाची कामं करून घ्याल. दिवस चांगला आहे. येणाऱ्या काळात तुमचं काम अधिक कार्यक्षमतेनं पूर्ण करण्यासाठी काही पर्याय मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहीवेळा माघार घ्यावी लागेल.

Advertisementधनु (Sagittarius) : गायन कलेला चांगला वाव मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. महिला दागदागिने खरेदी करतील. सामाजिक कार्यात हातभार लावाल. सर्वांशी गोडीने वागाल. वाद टाळणे हिताचे. शब्द जपून वापरणे लाभाचे. तब्येत सांभाळा. विचार करावा असा चांगला प्रस्ताव किंवा सूचना तुमच्या जोडीदाराकडून येऊ शकते. उत्तम व्यक्तिमत्वाची छाप पडेल. नातलग भेटतील.

मकर (Capricorn) : आर्थिक जबाबदारी वाढेल. गोष्टींची उपयुक्तता लक्षात घ्यावी. अनाठायी होणार खर्च टाळावा. अधिकारात वाढ संभवते. तिखट पदार्थ चाखाल. वेळेचे नियोजन महत्त्वाचे. योग्य वेळ साधून कृती करण्यावर भर द्या. बोलण्यात वेळ घालवू नका. हुशारीने प्रश्न सोडवू शकाल. विचारांच्या गर्दीनं मन भरकटेल. प्रत्येक गोष्टींचा रसास्वाद घ्याल. आपले विचार तरलपणे मांडाल. हातात काही नवीन गोष्टी येतील.

कुंभ (Aquarious) : ऊर्जेने कामे हाती घ्याल. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. काही गोष्टीत विरोध होऊ शकतो. कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्याल. स्नायू धरणे यांसारखे त्रास जाणवतील. हिशेबी राहा. आर्थिक नियोजन लाभाचे. वेळेचे महत्त्व ओळखा. कामं होतील. तुमच्या जोडीदारानं तुमच्याबाबतीत काही अंदाज बांधले आहेत. फॅशनची हौस पूर्ण करता येईल.

मीन (Pisces) : लिखाणात मन रमवाल. बुद्धीवादी विचार कराल. तुमच्यातील धाडस वाढेल. स्वबळावर विश्वास ठेवावा. स्वभावात काहीसा कठोरपणा येईल. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून कामं करा. प्रगती होईल. आत्मनिर्भरतेवर भर द्या. नवं शिकणं फायद्याचं हे लक्षात ठेवा. इतरांवर दबाव आणण्याचे तुमचे डावपेच आता अयशस्वी ठरतील. दिवस चांगला आहे.

Advertisement