SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्जासह मिळतात बरेच फायदे.., शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..!

भारत प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश.. भारतातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आजही शेतीच आहे.. देशाच्या विकासदरात (GDP) कृषी क्षेत्राचे योगदान 17 ते 18 टक्के आहे. त्यामुळे शेतकऱ्याला सोडून कोणत्याही सरकारला देशाचा विकास साधता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊनच केंद्र व राज्य सरकारकडून शेतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात.

शेती व्यवसायात (agri) सगळ्यात मोठी अडचण म्हणजे, भांडवल.. त्यातून अनेक शेतकरी खासगी सावकाराच्या दारात उभे राहतात. अव्वाच्या सव्वा व्याजावर कर्ज घेतात. नंतर हे कर्ज (loan) फेडता फेडता शेतकरी पुरता बेजार होताे. खासगी सावकारांच्या जोखडातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने 1998 मध्ये एक खास योजना सुरु केली होती..

Advertisement

‘किसान क्रेडिट कार्ड’ अर्थात ‘केसीसी’..(KCC).. असं या योजनेचे नाव.. ‘किसान क्रेडिट कार्ड’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली उन्नती साधता येते. या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

‘केसीसी’चे लाभार्थी कोण..?
‘केसीसी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असायला हवे. जास्तीत जास्त 75 वर्षांचे शेतकरीही या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे…

Advertisement
  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • ड्राइव्हिंग लायसन्स
  • पासपोर्ट
  • जमिनीची कागदपत्रे

‘केसीसी’चे शेतकऱ्यांना फायदे..
– किसान क्रेडिट कार्डवर 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळतं. या कर्जावर 7 टक्के दराने व्याज आकारले जाते, पण शेतकऱ्याने वर्षभरात कर्जाची परतफेड केल्यास, त्याला केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागते. कर्जाची मुदत उलटल्यानंतर सहामाहीपासून चक्रवाढ व्याज आकारले जाईल.

– किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना पिकांचा विमाही काढता येतो. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळते. पूर आल्यास, पाण्यात बुडून पिकाचे नुकसान झाल्यास, दुष्काळ पडल्यास, पीक जळून गेल्यास किसान क्रेडिट कार्ड अत्यंत उपयुक्त आहे.

Advertisement

– देशातील एकूण 14 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. केसीसी कार्डधारकांसाठी मोफत ‘एटीएम’ कार्ड दिले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक किसान कार्डच्या नावाने डेबिट/एटीएम कार्ड देते.
– शेतकऱ्यांना 1.60 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही सुरक्षिततेची आवश्यकता नाही.

अर्ज करण्याची पद्धत…
किसान क्रेडिट कार्डसाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. बँकेत किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठीचा अर्ज भरा व त्यानंतर वरील सर्व कागदपत्रे जमा करावी. त्यानंतर तुम्हाला ‘किसान क्रेडिट कार्ड’ मिळते. शिवाय बँकांच्या अधिकृत वेबसाईटवरही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement