SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 1500 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 35 लाख.., पोस्टाच्या ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या..

आयुष्याच्या उतार वयात गाठीशी दोन पैसे असणं गरजेचं असतं.. त्यासाठी बरेच जण अगदी तरुणपणातच नियोजन करतात. आपल्या कमाईतील काही भाग बचत म्हणून काढून ठेवतात. मात्र, बचतीच्या या पैशांचीही वृद्धी होणे महत्वाचे असते. त्यासाठी विविध योजनांमध्ये गुंतवणूक करता येते..

आर्थिक गुंतवणुकीमुळे परतावा (रिटर्न्स) मिळताे, मात्र तितकीच त्यात ‘रिस्क’ही असते. जितकी रिस्क (जोखीम) मोठी, तितका परतावा (रिटर्न्स) वाढत जाताे. मात्र, कमी रिस्कमध्ये चांगला परतावा मिळत असेल तर… पोस्ट विभागाची अशी एक योजना आहे, ज्यात तुमचे पैसे सुरक्षित तर राहतातच, शिवाय तुम्हाला चांगले ‘रिटर्न्स’ही मिळतात..

Advertisement

‘ग्राम सुरक्षा योजना’ असे या पोस्टाच्या योजनेचे नाव आहे. सरकारी योजना असल्याने त्यात पैसे बुडण्याची सूतराम शक्यता नाही. शिवाय चांगला परतावाही मिळतो. चला तर मग, या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..!

‘ग्राम सुरक्षा योजने’बाबत…
– 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणीही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो.
– योजनेअंतर्गत विम्याची कमीत कमी रक्कम 10,000 रुपये, तर जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
– मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर या योजनेचा प्रीमियम भरता येतो. ग्राहकांना प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधीही दिला जातो.
– पॉलिसी टर्म दरम्यान ‘डिफॉल्ट’ झाल्यास, ‘बिलेटेड प्रीमियम’ भरून ग्राहकांना पुन्हा ‘पॉलिसी’ सुरु करता येते.

Advertisement

किती पैसे मिळतात..?
समजा एखाद्याने 19 व्या वर्षी 10 लाख रुपयांची ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतली असेल, तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये राहिल. पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर खातेदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख, 58 वर्षांसाठी 33.40 लाख, तर 60 वर्षांनंतर 34.60 लाख रुपये मिळतील.

अन्य फायदे..
‘ग्राम सुरक्षा विमा योजने’त खातेदारांना कर्जही घेता येते. मात्र, पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4 वर्षांनंतरच कर्जाचा लाभ मिळतो. ग्राहकांना 3 वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर करता येते.. मात्र, त्यावेळी तुम्हाला कोणताही फायदा मिळत नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, पोस्टाकडून पाॅलिसीवर मोठा बोनसही मिळतो.

Advertisement

कुठे मिळेल संपूर्ण माहिती..?
पॉलिसीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता. इतर माहितीसाठी ग्राहक टोल-फ्री हेल्पलाइन 1800 180 5232/155232 किंवा अधिकृत वेबसाइट www.postallifeinsurance.gov.in वर संपर्क साधू शकता.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement