SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सावधान! सेकंड हँड बाईक खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी वाचा खास टिप्स..

आपल्याला पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे कधीकधी बाईकचा वापरही कमी करावा लागतोआणि आपण बचतही करतो. पण जर का आपण असा विचार केला तर..जर आपण कमी पेट्रोलमध्ये जास्त मायलेज देणारी बाईक घरी आणली तर आपला प्रवास सुखकर होईल आणि वेळेचीच नाही तर पैशाचीही बचत होईल. मग चिंतानका करू. सेकंड हॅन्ड बाईक हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू ठरतो. देशातील ऑटो सेक्टरमध्ये नवीन बाईक्सची जितकी मोठी बाजारपेठ तितकीच मोठी सेकंड हँड बाईकची सुद्धा आहे.

अनेकदा बजेटच्या कमतरतेमुळे, जेमतेम पगारामुळे लोकांना स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकणेही परवडत नाही. त्यामुळे अनेक जण चांगलं मायलेज देणाऱ्या गाडीच्या शोधात असतात. जर तुम्हालाही कमी बजेटमुळे पेट्रोल जास्त न खाणारी आणि पैशांची बचत करणारी बाईक तुमच्या मित्रांकडून, बाजारात किंवा ऑनलाईन घ्यायची असेल तर त्याआधी जाणून घ्या सेकंड हँड बाईक खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्स (Second Hand Bike Purchase Tips) जाणून घ्या..

Advertisement

▪️ सर्वात आधी तुम्ही तुमची गरज ओळखा आणि विचार करा की तुम्हाला नेमकं कोणती बाईक कोणत्या कामासाठी हवी आहे. मग त्या बाईकच्या मायलेजनुसार तिचा वापर करण्यास सोपं जाईल. जाई की, तुम्ही ऑफिसला, कंपनीत गेलात तर तुम्ही 100 सीसी मायलेज असलेली बाईक घ्या जी कमी खर्चात जास्त चालते.

▪️ जर तुम्ही सेकंड हँड बाईक खरेदी करत असाल तर पेट्रोलच्या वाढत्या भावानुसार योग्य कंपनीची निवड करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला ती बाईक विकायची असेल तर तुम्हाला तिची चांगली किंमत येईल. बाजारात बजाज, हिरो च्या बाईक्स सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या आहेत, हे आपल्याला माहितीच आहे.

Advertisement

▪️ सेकंड हँड बाईक खरेदी करताना बाईकच्या कंपनीसोबतच त्या बाईकचे कोणते मॉडेल अधिक मायलेज देईल आणि त्या बाईकचे अजूनही कंपनी उत्पादन करतेय का? याप्रकारे ते मॉडेल लक्षात ठेवा जेणेकरून बाईकमध्ये काही कमतरता असेल तर त्याचे पार्ट्स सहज मिळू शकतील. कारण अनेकदा 15 वर्षांपेक्षा जुने बाईकचे पार्ट्स बाजारात भेटत नाहीत.

▪️ जर तुम्ही सेकंड हँड बाईक विकण्यासाठी किंवा खरेदी ठरण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट किंवा पोर्टलचा अवलंब करत असाल, तर संबंधित व्यक्ती जर आसपासच्या शहरात असेल तर तुम्ही तिथे जाऊन बाईक घ्या किंवा तो व्यक्ती तुम्हाला बाईक पोहोच करेल असं सांगितलं असता त्याला पेमेंट करण्यापूर्वी पेमेंटचा काही भाग ऑनलाईन द्यायचा असेल तर तो किती दयायचा हे ठरून घ्या. अन्यथा कधीकधी आपली फसवणूकही होऊ शकते.

Advertisement

▪️ ऑनलाईन आपल्याला अनेक वेबसाईटवर जसे कि, droom, ola अशा साईटवर अनेक पर्याय पाहायला भेटतील. त्यामुळे येथे कमी किंमतीत छान बाईक आपण शोधू शकतो, हा आपला फायदा असतो. बाईकची स्थिती निश्चितपणे तपासा कारण दाखवलेली अट आणि डिलिव्हर केलेल्या बाइकची स्थिती यात अनेकदा फरक असतो. म्हणून सदर व्यक्तीला बाईकचे फोटोही पाठवायला लावा.

▪️ ऑनलाइन सेकंड हँड बाईक खरेदी करताना, जर तुम्हाला नवीन बाईक अगदी कमी किंमतीत मिळत असेल, तर फसू नका आधी व्यवस्थित बाईक कोण विकतंय आणि ती व्यक्ती कोण आहे, हे तपासून घ्या किंवा सोशल मीडियावर ती व्यक्ती आहे का हेही पाहा म्हणजे जास्त माहिती भेटली कि तुम्हाला विना अडचण बाईक घेता येईल. बाईकच्या डिलिव्हरीपूर्वी कधीच पूर्ण पैसे देऊ नका. नाहीतर तुम्ही फसाल.

Advertisement

▪️ बाईक विकत घेताना त्या बाईकचे संपूर्ण कागदपत्रे, तिचा अपघात इतिहास, सर्व्हिस रेकॉर्ड तपासा, जेणेकरून कोणताही ऑनलाइन गुंड तुम्हाला चोरीची बाईक विकू शकणार नाही. यातील ऑनलाईन बाईक खरेदी करणं अधिक फायद्याचं असू शकतं, फक्त तुम्ही या गोष्टी काळजीपूर्वक करा.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement