SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला फक्त 200 रुपयांमध्ये मिळेल ‘हा’ नवीन 5G स्मार्टफोन, करावं लागणार फक्त ‘हे’ काम..?

ऑफर्स आणि डिस्काउंट आजच्या काळात असलं तरच खरेदी असं एक समीकरणच झालं आहे. आपणही कुठे काहीतरी खरेदी केलं तर आधी डिस्काउंट विचारतो. म्हणून अनेक दुकानांत तर सोडाच आता ऑनलाईन असणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाईट देखील नवीन ऑफर्स ठेवून ग्राहकांना आकर्षित करत असतात. असच आता Amazon वर रोज नवनवीन ऑफर्स सुरु झाल्या आहेत. आजच्या डील ऑफ द डे मध्ये Redmi चा शानदार Redmi Note 10T 5G Smartphone खूपच कमी किंमतीत तुम्हाला विकत घेता येणार आहे.

किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या..

Advertisement

Redmi Note 10T 5G स्मार्टफोन 16,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनची अ‍ॅमेझॉनवर विक्री किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 3 हजार रुपयांच्या आकर्षक डिस्काउंटसह 500 रुपयांचा कुपन डिस्काउंटही दिला जाणार आहे. तसेच HDFC बँकेच्या कार्ड धारकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे हा फोन 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

या फोनवर मिळणारी 12,300 रुपयांची एक्सचेंज ऑफर तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून मिळवता येणार आहे. परंतु 12,300 रुपयांचा डिस्काउंट तुमच्या जुन्या मोबाईलच्या कंडीशन, ब्रँड आणि मॉडेलवर अवलंबुन असेल. परंतु संपूर्ण सवलत मिळाल्यास एक दमदार 5G स्मार्टफोन 199 रुपयांमध्ये तुमचा होईल. थेट डिस्काउंटसह बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा वापर केल्यास 16,999 रुपयांचा Redmi Note 10T 5G स्मार्टफोन फक्त 199 रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल.

Advertisement

Redmi Note 10T 5G चे फीचर्स:

▪️ Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले
▪️ डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट.
▪️ रेडमी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरसह Mali-G57 GPU देण्यात आला आहे.
▪️ अँड्रॉइड 11 आधारित MIUI सपोर्ट.
▪️ 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेज सपोर्ट.

Advertisement

कॅमेऱ्याबद्दल सांगायचं झालं तर..फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 10T 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेऱ्याचा समावेश. स्मार्टफोनमध्ये सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेराही असणार.

तसेच या स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये 4G LTE, WIFI, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक मिळणार आहे. Redmi Note 10T 5G मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी मिळते, ही बॅटरी 18 Watt Fast Charging टेक्नॉलॉजीसह येते. एकदा चार्ज केला कि, हा फोन दोन दिवस बॅटरी बॅकअप देईल, असा कंपनीचा दावा आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement