SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): धार्मिक गोष्टीत लक्ष घालाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आपल्याच मतावर आग्रही राहू नका. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. दिवसाची खिन्न सुरुवात तुम्हाला थोडीशी निराशाजनक वाटू शकते. पण बरीचशी कामं सुरळीत पार पडल्याने दिवस आशादायी असेल. धोरणात्मकरीत्या काम करणाऱ्यांकडे आजच्या दिवशी जास्त ऊर्जा असेल. ताणतणाव बाजूला सारावेत.

वृषभ (Taurus): गप्पीष्ट लोकांमध्ये वावराल. लहानांशी मैत्री कराल. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढेल. दिवस मानाजोगा जाईल.रागाला आवर घालणे. जपून शब्द वापरणे हिताचे. कायदे पाळणे लाभाचे. एखादी व्यक्ती कौटुंबिक समस्येसाठी तुमच्याशी संपर्क साधू शकते. निरोगी जीवन आणि काम यांचं संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. अघळपघळ बोलू नये.

मिथुन (Gemini) : बौद्धिक चातुर्य दाखवाल. कल्पकतेने विचार कराल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. व्यवहार चातुर्य दाखवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. आयुष्याबाबत नव्याने निवडी करण्याच्या उत्कृष्ट संधी तुम्ही नीट लक्ष दिल्यास मिळू शकतील. सध्या तुमची अंतःप्रेरणा प्रबळ आहे. तुमच्या भावना दडपण्याचा प्रयत्न करू नका, विशेषकरून तुमची काळजी करणाऱ्यांसमोर.

कर्क (Cancer) : बौद्धिक दृष्टीने विचार करावा. गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. लेखनाला चांगला उठाव मिळेल. लबाड लोकांपासून दूर राहावे. शैक्षणिक कामे पार पडतील.आजच्या दिवसात हलकेफुलके आणि गंभीर क्षणही अनुभवायला मिळू शकतात. तुम्ही भावनिक होऊ शकता आणि नंतर लगेचच व्यावहारिक व्हाल. तुमच्या वाटाघाटींशी निगडित कौशल्यांना थोडा उजाळा द्या.

Advertisementसिंह (Leo) : भावनेला आवर घालावी लागेल. मुलांचा व्रात्यपणा वाढेल. मैदानी खेळ खेळाल. अंगातील जोम वाढेल. काही कामे विनासायास पार पडतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणे टाळा. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे. नियोजन करून काम करणे हिताचे. चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल.

कन्या (Virgo) : सर्वबाबी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. हजरजबाबीपणा दाखवाल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल. अति चिकित्सा करू नका. कामात तत्परता दाखवावी.आत्मप्रौढी टाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. नियोजन करून कामं करा. आर्थिक नियोजन हिताचे. सातत्य राखल्यास तुम्हाला चांगली प्रगती करता येईल. रागीटपणाच्या समस्येमुळे तुमचं लक्ष विचलित होईल.

तुळ (Libra) : घरातील गोष्टीत अधिक लक्ष घाला. नवीन मित्र जोडाल. कामात स्त्रियांची मदत घ्याल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.हातून धार्मिक कार्य घडले. दिवस चांगला जाईल. महत्त्वाचे प्रश्न सुटतील. मतभेद चर्चेतून सोडवणे हिताचे. कोणत्याही नवीन कागदपत्रांवर सही करायची घाई करू नका. मत्सरावरचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वतःकडील चांगल्या गोष्टी पाहणं.

वृश्‍चिक (Scorpio) : अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. शांतपणे विचार मांडावेत. भौतिक गोष्टींचा फार विचार करू नका.एखादी झटपट ट्रिप करण्याच्या विचारात असल्यास ही वेळ त्यासाठी चांगली आहे. आजच्या दिवसात गंभीर विषयाबद्दलची चर्चा तितकीशी साध्य होणार नाही, ती नंतरसाठी राखून ठेवा. एखाद्या साध्या वाटणाऱ्या प्रस्तावातही बरेच छुपे तपशील असू शकतात.

Advertisementधनु (Sagittarius) : गप्पांची आवड पूर्ण कराल. संभाषण कौशल्य दाखवता येईल. मित्रांचा गोतावळा जमवाल. नातेवाईकांची गाठ पडेल. कष्टांना पर्याय नाही. नियोजन करून काम करा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. दिवस बरा जाईल. जोडीदार आणि आई-वडील यांच्यात रस्सीखेच होऊ शकते. तुमची मुत्सद्देगिरी आणि अनुभव या ठिकाणी महत्त्वाचे ठरतील. कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्यावे.

मकर (Capricorn) : सतत काहीनाकाही विचार करत राहाल. योग्य परीक्षण करावे लागेल. उत्तम लिखाण करता येईल.भूतकाळाच्या प्रयत्नांवर आता फुशारकी मारल्यास त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर व्हायला सुरुवात होऊ शकते. तुमच्या मुलांना रोजच्या कामात मदत करण्याची हीच वेळ आहे. पचनाबाबतच्या काही समस्यांमुळे तुम्हाला घरच्या जेवणावरच अवलंबून राहावं लागण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarious) : कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल. बौद्धिक दृष्टीने विचार मांडाल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल. चिकाटी सोडू नका. जुनी कामे डोकेवर काढतील.तुमच्या दृष्टिकोनाचं मूल्य इतरांनी ओळखणं महत्त्वाचं आहे. एखादी मस्करी फार झाल्यास त्याची कुस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादं सामाजिक कार्य नियोजनप्रमाणे न होण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces) : कामातील घाई उपयोगाची नाही. वैचारिक स्थिरता ठेवावी. प्रवासात काळजी घ्यावी. संयम बाळगावा लागेल. प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.प्रयत्नांमध्ये सातत्य आणि नियोजन महत्त्वाचे. शब्द जपून वापरणे आणि नियम-कायदे पाळणे हिताचे. आत्मप्रौढी टाळा. एखाद्या नव्या व्यवसायाचं नियोजन आता आकार घेण्याची शक्यता आहे. ज्ञानात भर पडेल.

Advertisement