SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात ‘ही’ खास सवलत मिळणार नाही, मोदी सरकारची मोठी घोषणा..!

ज्येष्ठ नागरिकांना यापुढे रेल्वे प्रवासात तिकिटावर कोणतीही सुट दिली जाणार नसल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

कोरोना येण्यापूर्वी ज्येष्ठांना रेल्वे तिकीटावर सूट मिळत होती. मात्र, कोरोना काळात ही सूट बंद करण्यात आली. आता कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने ज्येष्ठांना पुन्हा एकदा रेल्वे तिकिटात सूट मिळेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, तो फोल ठरला आहे.

Advertisement

याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, की सध्या तरी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकीटात कोणतीही सूट मिळणार नाही. त्यांना रेल्वे प्रवासासाठी पूर्ण भाडेच भरावे लागणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल.

कोरोना काळात रेल्वेसेवा बंद पडली होती. नंतर संसर्ग काहीसा कमी झाल्यावर रेल्वेने काही स्पेशल ट्रेन सुरू केल्या होत्या. त्यावेळी ज्येष्ठांना तिकिटात दिली जाणारी सूट बंद केली होती. आता रेल्वे पूर्ववत सुरु झाल्या असल्या, तरी ज्येष्ठांना तिकिटात सूट दिली जाणार नाही..

Advertisement

आता ‘या’ प्रवाशांनाच सूट

सध्या फक्त तीन प्रकारच्या प्रवाशांना तिकीटात सुट मिळते. त्यात दिव्यांग, गंभीर आजारी रुग्ण व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नावर प्रचंड परिणाम झालाय. अशा वेळी ज्येष्ठांना पुन्हा तिकीटात सवलत दिली, तर रेल्वेला मोठा फटका बसेल, असे ते म्हणाले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement