SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी, महागाई भत्त्याबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय..!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. मोदी सरकारने केंद्रिय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत (DA) नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला. त्यामुळे देशभरातील 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी व 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना मोठा धक्का बसला आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्र सरकार महागाई भत्ता ठरवित असते. काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढल्याने महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी करीत आहेत. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळतो. होळीपूर्वी त्यात 3 टक्क्यांची वाढ होऊन महागाई भत्ता 34 टक्क्यांवर जाणार असल्याचे बोलले जात होते.

Advertisement

दरम्यान, महागाई दर वाढलेला असताना, केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यातील वाढ 3 टक्केच स्थिर का ठेवली, असा सवाल खासदार नारन भाई जे राठवा यांनी राज्यसभेत उपस्थित केला. त्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिलं.. केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांचा महागाई भत्ता व महागाई दिलासा वाढवण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.

‘डीए’मध्ये वाढ करण्याची गरज नाही
ते म्हणाले, की “केंद्रीय श्रम मंत्रालयाने जारी केलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांका (AICPI-IW) नुसार, महागाईच्या आधारावर ‘डीए’ व ‘डीआर’मध्ये वाढ केली जाईल. गेल्या दोन तिमाहीत महागाई दर 5 टक्क्यांहून अधिक असला, तरी महागाई भत्त्यात 3 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची गरज नाही.”

Advertisement

केंद्र सरकारचा ‘डीए’मध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा कोणताही विचार नाही. केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत दरात सुधारणा करण्याची गरज नसल्याचे राज्यमंत्री चौधरी यांनी स्पष्ट केले.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement