SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता व्हॉट्सॲपवर मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी येणार अडचणी, कंपनी उचलणार ‘हे’ कठोर पाऊल..

व्हॉट्सॲप (WhatsApp) हे संवाद साधण्याचं एक सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग प्रभावी ॲप आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सॲप सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सॲप चा वापर आपल्याला फोटो, व्हिडीओ, फाइल्स, चॅट (Whatsapp Chat) , ऑडिओ-व्हिडीओ कॉल Whatsapp Audio-Video Call), पेमेंट्स (Whatsapp Payments) अशा गोष्टी वापरायला मिळत असल्याने हे जगभरात प्रसिद्ध आहे. आता हेच मेसेज फॉरवर्ड करण्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.

व्हॉट्सॲपवर आपल्यासाठी एखादा मेसेज हा अनेक लोकांना पाठवण्याची सोय आहे. सध्या एखादा मेसेज आपण 5 जणांना फॉरवर्ड करू शकतो. पण आता नवीन अपडेटनुसार आता असं करता येणार नाही, अशी माहिती आहे. व्हॉट्सॲपवर आपल्याला एकापेक्षा अधिक लोकांना मेसेज फॉरवर्ड करता येणार नसल्याचं त्यात म्हटलं आहे.

Advertisement

WABetaInfo ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीच्या आधारे…

व्हॉट्सॲप आपल्या युजर्सला सतत नवे अपडेट देत असतं. आता कंपनी या ॲपच्या फॉर्वर्ड मेसेज फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सॲप आपल्या मेसेज फॉर्वर्ड सर्विसची लिमिट सेट करण्यावर काम करत आहे. आता व्हॉट्सॲप युजर्स एका वेळी फक्त एका युजरलाच मेसेज फॉर्वर्ड करू शकणार आहेत, असं म्हटलं आहे. यापूर्वी हे लिमिट 5 जणांना फॉरवर्ड करण्याचे होते.

Advertisement

काही वादग्रस्त आणि व्हायरल मेसेजेसना आळा बसावा म्हणून या अपडेटवर कंपनी कित्त्येक दिवसांपासून काम करत आहे. आता कंपनीने कठोर पाऊल उचललं आहे. हे पाऊल कंपनीने Whatsapp App च्या माध्यमातून चुकीची माहिती आणि फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी उचललं असल्याचं सांगण्यात येतंय.

WABetaInfo ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देताना व्हॉट्सॲप आता मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी नवीन लिमिट आणत असल्याचं म्हटलं आहे. कंपनीने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून चुकीची माहिती आणि फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी असं केलं आहे. व्हॉट्सॲप च्या फॉरवर्डिंग मेसेज फीचरद्वारे यूजर्स एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये मेसेज पाठवू शकतात. पाठवण्यात आलेल्या या मेसेजच्या अगदी वरच्या बाजूस फॉर्वर्डेड (Whatsapp Message Forwarded) असं लेबल दिसतं. ज्या व्यक्तीला आपण हा मेसेज फॉरवर्ड केलेला आहे, त्यावरून त्याला हा मेसेज फॉरवर्डेड असल्याचं समजतं.

Advertisement

लक्षात ठेवा की, एखादा मेसेज पाच पेक्षा जास्त वेळा पाठवला गेला असेल तर त्याच्यावर ‘Forwaded many times’ असं लिहिलं जातं. पण आता हे रिस्ट्रिक्टेड केलं आहे. WABetainfo ने एक रिपोर्ट जारी केला होता. त्या प्राप्त रिपोर्टनुसार, येणाऱ्या काळात आता सर्व मेसेज फॉरवर्ड करण्याची लिमिट कमी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे व्हॉट्सॲप लवकरच मेसेज एकाहून अधिक ग्रुपमध्ये फॉर्वर्ड करण्यावर बंदी आणणार असल्याचं म्हटलं जात आहे. मेसेजिंग व्हॉट्सॲप वर चुकीचा मेसेज व्हायरल होऊ नये म्हणून युजरला त्यांचा फॉरवर्ड मेसेज रिव्ह्यू करण्यासाठी आणि चुकीच्या बातमीचा किंवा मेसेजचा प्रसार मर्यादित करण्यासाठी हे नवं अपडेट फायद्याचं ठरणार आहे
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement