SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): नामस्मरण करण्यात वेळ घालवावा. नसती काळजी करत बसू नका. कामातील विलंब दूर करण्याचा प्रयत्न करा. मुलांशी क्षुल्लक गोष्टींवरून वाद संभवतात. वाद टाळणे, नियम-कायद्यांचे पालन करणे हिताचे. रागावर नियंत्रण राखणे आवश्यक. तब्येत सांभाळा. दिवस चांगला जाईल. नियोजन फायद्याचे ठरेल. काही वाचन किंवा अभ्यास कराल. भावंडांचा विरोध जाणवेल.

वृषभ (Taurus): मुलांकडे लक्ष ठेवावे. जोडीदाराचा प्रेमळपणा वाढीस लागेल. उत्तम भागीदार मिळेल. चार नवीन गोष्टी जाणून घेता येतील. प्रवासाचा योग आहे. परदेशी जाण्याची संधी आहे. दिवस चांगला आहे. लगबग होईल. नियोजन महत्त्वाचे आहे. खर्चात वाढ संभवते. कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील. अधिकारी व्यक्तीशी ओळख करून काही तरी उपयोग होईल.

मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. चांगल्या लोकांचा सहवास लाभेल. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील. जवळचे नातेवाईक भेटतील. व्यवहारी विचार कराल. चुका टाळणे आणि नियोजन करुन काम करणे हिताचे. शब्द जपून वापरणे लाभाचे. दिवस लाभाचा आहे. वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे. कायदे पाळणे फायद्याचे. उत्तम आरोग्य लाभेल. बंधू भेट होईल. कार्यक्षेत्रात सफलता मिळेल.

कर्क (Cancer) : जवळचा प्रवास मजेत पार पडेल. विरोधाला विरोध करू नका. भावंडांना मदत करता येईल. कंजूषपणा कराल.घरच्यांना वेळ द्या. वेळेचे व्यवस्थापन लाभाचे. गोड बोला आणि वाद टाळा. दिवस चांगला जाईल. आईकडचे नातेवाईक भेटतील. दिवस चांगला जाईल. हुरहुर लावणारा दिवस आहे. थकवा वाटेल. आराम करावा. नवीन वस्तूची खरेदी नक्की होणार. कामाच्या ठिकाणी अचानक काही नवीन संधी मिळतील.

Advertisementसिंह (Leo) : आवडत्या गोष्टी कराल. आपली उत्तम छाप पडेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. कामातून समाधान लाभेल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.हुशारीने चर्चेने प्रश्न सुटेल. सामंजस्य महत्त्वाचे आहे. इतरांवर प्रभाव पाडू शकाल. दिवस चांगला जाईल. नियोजन लाभदायी ठरेल. आर्थिक परिस्थिती ठिक राहिल. दिवस मध्यम आहे. आवडीचे पदार्थ खाल. विचार करून नियोजन करा.

कन्या (Virgo) : कौटुंबिक क्षण आनंदात जातील. सर्वांना आपलेसे करून घ्याल. गैरसमजाला खतपाणी घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. अतिरेक टाळणे, सावध राहणे हिताचे. नियोजन लाभाचे. शब्द विचारपूर्वक वापरणे फायद्याचे. कोणावरही जास्त विसंबून राहणे टाळावे. प्रवास, मनोरंजनाचा अनुभव तुम्हाला दिवसभर जाणवेल. आध्यात्मिक प्रगती आणि त्यासाठी खर्च दाखवित आहे.

तुळ (Libra) : घरातील वातावरण आनंदी राहील. मनासारखे काम करता येईल. घराची स्वच्छता ठेवाल. वैचारिक बाजू सुधारेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. जिद्द कायम ठेवा. प्रयत्नांमध्ये सातत्य आणि नियोजन महत्त्वाचे. शब्द जपून वापरणे आणि नियम-कायदे पाळणे हिताचे. नवी गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. कर्तेपणाचा मान मिळवाल.

वृश्‍चिक (Scorpio) : घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी.स्वतःच्या हिंमतीवर प्रगती कराल. चांगला दिवस आहे. नव्या अनुभवातून शिकाल. ओळखींचा व्यवस्थित वापर करून घेणे हिताचे. वाद टाळा आणि कायदा पाळा. कायदा पाळा. आध्यात्मिक प्रगती, प्रवास आणि एखाद्या विशिष्ट स्थळाला भेट असा दिवस आनंदात जाईल. मनातील इच्छेला प्राधान्य द्याल. आज जास्त आनंद होईल.

Advertisementधनु (Sagittarius) : वैद्यकीय व्यवसायातील लोकांना चांगला लाभ होईल. विशेष अधिकार हातात येतील. घरातील लोकांची उत्तम साथ मिळेल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील.धर्मकार्य घडेल. दानधर्म कराल. दान गुप्तपणे करा. आपले काम करा फळाची अपेक्षा बाळगू नका. लाभाचा दिवस आहे. घरातले तुमच्यावर खुश राहतील.

मकर (Capricorn) : अचानक धनलाभाची शक्यता. रेस,जुगार यातून लाभ संभवतो. मनाची चंचलता लक्षात घ्यावी. सामाजिक वादात लक्ष घालू नये. मनातील निराशा बाजूला ठेवावी.क्षमता ओळखून कृती करणे फायद्याचे. निर्णय विचारपूर्वक करावे. अती घाई संकटाकडे नेई हे लक्षात ठेवावे. दिवस बरा जाईल. आर्थिक स्थिती ठिक. दिवस चांगला जाईल. चर्चा, संभाषण यश देईल.

कुंभ (Aquarious) : आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल. मदतीचे समाधान कमवाल. कमतरता भरून निघायला मदत होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल.आनंदात राहाल. दिवस चांगला जाईल. तब्येत जपा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. वेळेत कर्ज फिटण्याची शक्यता. घरामध्ये विशेष पूजा केली जाईल.

मीन (Pisces) : तुमच्यातील परोपकारीपणा दिसून येईल. आशावादी विचार मांडाल. सर्व गोष्टींकडे अभ्यासू नजरेने पहाल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. लेखकांना उत्तम लिखाण करता येईल. सर्वांचा विचार करुन निर्णय घेणे लाभाचे. वास्तवाचे भान राखणे हिताचे. खर्च योग्य ठिकाणी करावा. सावध राहणे फायद्याचे. आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यात यश प्राप्त कराल. घरात शांतीचं वातावरण असेल.

Advertisement