SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सुरेश रैनाची ‘आयपीएल’मध्ये दणक्यात ‘एन्ट्री’..! आता नव्या भूमिकेत दिसणार..

‘मिस्टर आयपीएल’ अशी ओळख असणारा, या स्पर्धेचा सर्वाधिक अनुभव असलेला भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना यंदाच्या ऑक्शनमध्ये ‘अनसोल्ड’ ठरला.. ‘आयपीएल’च्या ‘मेगा ऑक्शन'(Mega auction)मध्ये तब्बल 600 खेळाडूंवर बोली लागली. मात्र, कोणत्याही संघ मालकाने सुरेश रैनावर (Suresh Raina) विश्वास दाखवला नाही..

दरम्यानच्या काळात काही खेळाडूंना यंदाच्या ‘आयपीएल'(IPL-2022)मधून माघार घेतल्याने सुरेश रैना पुन्हा एकदा ‘आयपीएल’मध्ये दिसू शकतो, असे बोलले जात होते. मात्र, त्यानंतरही बदली खेळाडू म्हणूनही रैनाची कुणी निवड केली नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती.

Advertisement

रैना नव्या भूमिकेत दिसणार..
आता रैनाच्या फॅन्ससाठी एक मोठी बातमी आली आहे. ‘आयपीएल’च्या 15 व्या हंगामात सुरेश रैनाची पुन्हा एकदा दणक्यात ‘एन्ट्री’ होणार असल्याचं निश्चित झालंय. मात्र, या वेळी तो मैदानावर फलंदाजी करताना दिसणार नाही, तर काॅमेंट्री बाॅक्समध्ये ‘बोलंदाजी’ करताना दिसेल. एका नव्या भूमिकेत रैना प्रेक्षकांसमोर येणार असून, त्यांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागलीय.

याबाबत, ‘डिस्ने + हॉटस्टार’चे संजोग गुप्ता यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की “यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सुरेश रैना खेळत नाही. मात्र, आम्हाला त्याला कोणत्या ना कोणत्या रुपात ‘आयपीएल’मध्ये सामील करायचं होतं. तो हिंदीतून काॅमेंट्री करणार आहे. मात्र, मुंबईची बोली त्याच्या हिंदीत दिसते, त्यामुळे तो हिंदी शिक्षकाकडून क्लासेस घेतोय…!”

Advertisement

सुरेश रैना 2008 पासून ‘आयपीएल’ खेळला. त्याने 205 मॅचमध्ये 1 शतक व 39 अर्धशतके ठोकली असून, एकूण 5528 रन केले आहेत. ‘गुजरात लायन्स’ टीमचा कॅप्टनही तो होता. मात्र, धोनीच्या नेतृत्वाखाली ‘सीएसके’ संघात त्याची कारकिर्द चांगलीच बहरली..

रवि शास्रीही परतणार..
दरम्यान, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर रवी शास्री पुन्हा एकदा काॅमेंट्री बाॅक्समध्ये परतणार आहेत. रवी शास्त्री हे इंग्रजीतील अनुभवी समालोचक मानले जातात. त्यांच्या काॅमेंट्रीचे अनेक फॅन आहेत, पण यावेळी तेही हिंदीत काॅमेंट्री करणार आहेत. सुरेश रैना सोबत रवी शास्री अशी जोडी यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement