SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शाहरुख खान करणार ओटीटी वर दमदार एंट्री; केली ‘या’ वाहिनीची घोषणा..

सध्याच्या जगात OTT प्लॅटफॉर्म्सची लोकांमध्ये किती क्रेझ आहे, हे शब्दांत सांगणं कठीण आहे. अनेक अभिनेते याकडे वळले असून मनोरंजनाच्या दुनियेत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. काही फ्लॉप ठरणारे अभिनेते-अभिनेत्री यांनाही या ठिकाणी लोकप्रियता मिळाली आहे. शाहरुख खानचे (Shahrukh Khan) फॅन फॉलोइंग किती आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी फॅन्स नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. म्हणून आता शाहरुखने स्वतःच्या वाहिनीची घोषणा केली आहे. त्यामुळे ही शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. जाणून घेऊ सविस्तर..

शाहरुख खान कोणती वाहिनी आणणार?

Advertisement

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान लवकरच त्याचे नवीन ‘ओव्हर द टॉप’ (OTT) प्लॅटफॉर्म ‘SRK+’ घेऊन येणार आहे. खुद्द शाहरुख खानने ट्विट करून तशी माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मानेही तिच्या निर्मिती संस्थेंतर्गत फक्त स्त्रीप्रधान आशयनिर्मिती करणाऱ्या ओटीटीची घोषणा केली असतानाच दुसरीकडे बॉलीवूड बादशहा शाहरुख खाननेही आपल्या नावाने ओटीटी सुरू करत असल्याचं सांगितलं.

शाहरुख खान 2018 नंतर झिरो हा चित्रपट केल्यानंतर मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर शाहरुख खान गेले कित्येक दिवस माध्यमांपासून दूर आहे. मधल्या काही काळात त्याच्या जाहिरातीही थांबवण्यात आल्या होत्या. आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मात्र गोष्टी हळूहळू निवळत गेल्या. परंतु आता शाहरुख खानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून पोस्टर शेअर केले आहे – Kuch kuch hone wala hai, OTT ki duniya mein. (काहीतरी घडणार आहे, OTT च्या जगात..!) असं ट्विट करत माहिती दिली. शाहरुख खानचे ट्विट शेअर करत सलमान खानने त्याचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

शाहरुख खानने काळ ट्विटरवर ट्विट करून स्वतंत्र ओटीटी वाहिनीची घोषणा केली असून तो लवकरच ‘एसआरके प्लस’ (SRK PLUS) नावाचे स्वत:चे ओटीटी माध्यम आणणार आहे. शाहरुखने मंगळवारी ट्विटरवरून याबद्दल जाहीरपणे सांगितले. शाहरुखने स्वत:च ‘एसआरके प्लस’ या नव्या ओटीटीची घोषणा करत आपणही ओटीटी मधून एंट्री मारणार आहोत, हे दाखवून देत आहे.

बॉलीवूड कलाकार ओटीटीवर केवळ अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन यापुरते मर्यादित राहिलेले नसून एकूणच ओटीटी माध्यमातील त्यांचा व्यावसायिक रस वाढत चालला आहे. यापूर्वी निर्माती एकता कपूर हिने ‘अल्ट बालाजी’ हे स्वत:चे ओटीटी माध्यम आणून सक्सेस करून दाखवले. मागील काही दिवसांतच अनुष्का आणि तिचा भाऊ यांनी त्यांच्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’अंतर्गत ‘क्लीन ओटीटी’ची घोषणा केली, तर पुष्पा चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनला आवाज देणारा अभिनेता श्रेयस तळपदेनेही ‘झी थिएटर’च्या सहयोगाने खास नाटकांसाठीचे ओटीटी सुरू केलेय. तर प्रसिद्ध निर्माता – दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनीही ‘वायआरएफ एन्टरटेन्मेंट’ या नव्या ओटीटी वाहिनीची घोषणा केली असून त्यासाठी त्यांनी 500 कोटींची गुंतवणूक केल्याचं समजतंय.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖
🎯 _तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा_ 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement