SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मनसेचा दणका! आयपीएल मधील खेळाडूंच्या बसची केली तोडफोड, नेमकं प्रकरण काय..?

आयपीएलमधील खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने खेळाडूंसाठी असणारी बस येताच काल रात्री फोडली असल्याची माहिती आहे. काल रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास ताज हॉटेलसमोर ही घटना घडली असल्याचं कळतंय. यामुळे वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे.

वाचा सविस्तर प्रकरण..

Advertisement

महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात सरावासाठी आलेल्या संघातील खेळाडूंची हॉटेल ते स्टेडियम ने- आण करण्यासाठी काही बसची व्यवस्था असते. अनेकदा इशारा देउनही मुंबईतील मराठी वाहतूक व्यवसायिकांना हे काम देण्यात आलेलं नाही, महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून परराज्यातील व्यावसायिकांच्या घशात घालायचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे मनसेने हा दणका दिला आहे, असा आरोप मनसेने केलाय.

आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करूनही काही बदल झाला नाही. काल रात्री सुमारे 11.30 वाजेच्या आसपास ताज हॉटेलच्या समोरच ही घटना घडली आहे. मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांनी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री ताज हॉटेलसमोर आयपीएलमधील संघासाठी आलेली बस फोडली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी मनसे वाहतूक सेनेच्या उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्यासह वाहतूक पदाधिकाऱ्यांना कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा मुंबईतल्या स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं हे काम देण्याची मागणी मनसेने वारंवार केली होती. ही मागणी या आधीपासूनच लावून धरली होती. पण मराठी व्यावसायिकांऐवजी दिल्लीतील व्यावसायिकांना कामाचे कंत्राट दिले जाते, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केलाय. म्हणून प्रशांत गांधी यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी मंगळवारी रात्री या बसच्या काचा आणि लाईट्स फोडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’ अशा घोषणा देत बसवर ‘मनसेचा दणका’ असं लिहिलेले पोस्टर चिकटवून मनसेने बसच्या काचा फोडत तोडफोड केली.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement