SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयफोन-13’ सामान्यांच्या आवाक्यात, ‘येथे’ मिळतोय घसघशीत डिस्काऊंट..!

स्मार्टफोनमधील सर्वाधिक महागडा फोन म्हणजे, आयफोन..! प्रत्येकाचे आयफोन खरेदी करण्याचं स्वप्न असतं. परंतु, ‘आयफोन’चा ‘भार’ खिशाला पेलणारा नसतो.. ‘आयफोन’च्या किंमती आवाक्याबाहेर असल्याने ‘आयफोन’ खरेदी करण्याचा विचारही सर्वसामान्यांच्या स्वप्नात येत नाही..

आता मात्र हाच ‘आयफोन’ सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलाय. कारण, त्याच्या किंमती बऱ्याच कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘अ‍ॅपल’ने (Apple iphone -13) ‘आयफोन-13 सीरिज’ लाॅंच केली होती. त्यात ‘आयफोन 13 मिनी’, ‘आयफोन 13’, ‘आयफोन 13 प्रो’ आणि ‘आयफोन प्रो मॅक्स’ लॉंच करण्यात आले होते.

Advertisement

‘आयफोन’ खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर ‘अमेझाॅन’ या ई-काॅमर्स साईटवर तुम्ही तो स्वस्तात खरेदी करु शकता. सध्या ‘अमेझाॅन’चा सेल संपला असला, तरी अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स सुरु आहेत. त्यात तुम्हाला सवलतीच्या दरात नवीन ‘आयफोन-13’ खरेदी करता येणार आहे.

‘अमेझाॅन’वर ‘आयफोन-13’मधील 128GB, 256GB व 512GB स्टोअरेज असणाऱ्या मॉडेल्सवर सूट मिळत आहे. हा फोन रेड, मिडनाईट, पिंक, ब्लू आणि स्टारलाईट अशा पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

किती सवलत मिळणार?
‘अमेझाॅन’वर ‘आयफोन – 13’वर  6000 रुपयांची झटपट सूट मिळते आहे. ही ऑफर ‘आयसीआयसीआय’ (ICICI Bank), ‘एसबीआय’ (SBI) क्रेडिट कार्ड, अमेझाॅन पे ‘आयसीआयसीआय’ (Amazon Pay ICICI) बँक क्रेडिट कार्ड व कोटक बँकेच्या कार्डवर उपलब्ध आहे. शिवाय ‘नो-कॉस्ट ईएमआय’ आणि ‘एक्सचेंज ऑफर’ही उपलब्ध आहेत.

‘अमेझाॅन’वर सगळ्या डिस्काउंटनंतर ‘आयफोन-13’च्या 128GB स्टोअरेज वेरिएंटची किंमत 73,990 रुपयांवरुन कमी होऊन 67,990 रुपयांवर आली आहे. 256GB स्टोरेज व्हेरिएंट 81,990 रुपये, तर 512GB स्टोअरेजचा फोन 1,04,900 रुपयांना मिळणार आहे..

Advertisement

बॅंक ऑफरसोबतच तुम्ही तुमचा जुना फोन ‘एक्सचेंज’ करून नवा फोन घेऊ शकता. अॅमेझॉनवर ग्राहकांना 15,600 रुपयांपर्यंत ‘एक्सचेंज ऑफर’ दिली जात आहे. अर्थात जून्या फोनचे मूल्य त्याच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. तुमच्या जून्या फोनच्या स्थितीनुसार ‘एक्सचेंज’ किंमत मिळणार आहे.

‘एक्सचेंज’ ऑफर व बॅंक ऑफर एकत्र केल्यास तब्बल 21,600 रुपयांची बचत होऊ शकते. त्यानंतर ‘आयफोन-13’च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 52,390 रुपये होईल. त्याच वेळी 256GB फोन 60,390 रुपये, तर 512GB फोन 83,300 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement