SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावी पास उमेदवारांसाठी नौदलात बंपर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय नौदलात तब्बल 2500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय नौदलातील ए.ए. / एस.एस. आर. (Indian Navy SSR AA Bharti 2022) इथे ही भरती होत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत.

या नोकर भरतीसाठी पात्रता, अर्ज कुठे व कसा करायचा, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा- 2500

या पदांसाठी भरती
– ए. ए. (Artificer Apprentice) – 500
– एस. एस. आर. (Sr. Sec. Recruit) – 2000

Advertisement

शैक्षणिक पात्रता व पगार

ए. ए. (Artificer Apprentice) –  इच्छूक उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी पास झालेला असावा. नोटीफिकेशनमध्ये दिल्याप्रमणे शिक्षण आणि पात्रतेच्या अटी पूर्ण केलेल्या असाव्यात.
पगार- 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना

Advertisement

एस. एस. आर. (Sr. Sec. Recruit) – मान्यताप्राप्त संस्थेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतलेलं असावं. शिक्षण व पात्रतेच्या सर्व अटी-शर्थी पूर्ण असाव्यात.
पगार- 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रं
– Resume (बायोडेटा)
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (राखीव प्रवर्गासाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2022

इथे करा ऑनलाईन अर्ज
https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state

Advertisement

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

 

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement