SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: होळी, धुळवडीसाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी, तूम्हाला ‘हे’ नियम पाळावेच लागणार..

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक महिन्यांपासून सण साजरे करणे सरकारच्या नियमांमुळे आपले कमीच झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असून त्यामुळे निर्बंधही कमी झाले आहेत. राज्यात निर्बंध कमी झाल्याने नागरिक आता लग्न, वाढ़दिवस आणि इतर कार्यक्रम उत्साहात साजरे करत आहेत. आता होळी (Holi), धुळवड (Dhulivandan/Dhulvad) साजरी करण्याचा अनेक जण बेत आखत आहेत. उद्या 17 तारखेला होळीचा (Holi) सण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे.

होळीच्या (Holi 2022) सणाची सगळीकडे लगबग आहे. तसेच यंदा तुम्हाला सेलिब्रेशन करण्यासाठी काही मोकळीक जरी भेटली तरी काही नियम पाळणे गरजेचे असणार आहे. त्यामध्ये आधीच्या नियमांचाही सवॆश असणार आहे. यासाठी सरकारने जी नियमावली (Maharashtra government issued guidelines for celebration of holi) जाहीर केली आहे. ती तुम्हाला पाळणे बंधनकारक असणार आहे.

Advertisement

कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसून फक्त रुग्णसंख्या कमी झाल्याच्या आधारावर राज्यात काही दिवसांपूर्वीच निर्बंध शिथिल केले आहेत. नागरिकांनी वेळोवेळी सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करणे, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे. हे नियम पाळावेच लागणार आहेत; अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत.

सरकारने जारी केलेली नियमावली:

Advertisement

▪️ रात्री दहा वाजेच्या आत होळी करावी.
▪️ 10 वाजण्याच्या आधी होळी लावणं बंधनकारक असून त्यानंतर परवानगी नाही.
▪️ होळी साजरी करत असताना डीजे-डॉल्बी लावण्यास बंदी.
▪️ डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई.
▪️ होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई.
▪️ महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी.
▪️ दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने कमी आवाजात लाऊड स्पीकर लावावा, अन्यथा कारवाई.
▪️ कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.
▪️ धुळवडीच्या दिवशी जबरदस्ती रंग व पाण्याचे फुगे, पिशव्या फेकू नये.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement