SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यात लवकरच पोलिसांची मेगा भरती होणार, गृहमंत्र्यांनी केली मोठी घोषणा..

पोलिस होण्याचं स्वप्न अनेक जणांचं आता सत्यात उतरणार असल्याचं दिसत आहे. कारण पोलीस भरतीबाबत (Police Bharti News) राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

आम आदमी पार्टी ‘हा’ पक्ष येत्या काळात देशपातळीवर तिसरा पर्याय म्हणून ठरू शकतो का?

सोमवारी अधिवेशनात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढील काही दिवसात महाराष्ट्रात 7 हजार 231 पदांवर पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच राज्यात 5297 पदांची पोलीस भरती अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Advertisement

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिक माहीती देताना सांगितलं की, “पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5 हजार 297 पदांबाबत भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यातून निवड झालेल्या उमेदवारांना काही दिवसांतच नेमणुका देण्यात येईल”, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

तसेच, काही दिवसांपासून चालू असलेल्या पेपरफुटी प्रकरणावरही त्यांनी खंत व्यक्त केली. त्यावरून ते म्हणाले की, मंत्रीमंडळाने पोलीस भरतीला मंजुरी दिली असून या परीक्षेत कसलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

Advertisement

“राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदारांना पोलीस दलात जाण्याची संधी उपलब्ध आहे, यासाठी पूर्वी 15 वर्षांची अट होती, ती आता 12 वर्षांची केली आहे. तसेच, कोरोना काळात पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुक करुन 394 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे”, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

पोलीस स्टेशनसोबतच निवासी इमारतींसाठीही मोठी तरतूद

Advertisement

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या जुन्या इमारतींच्या सुधारणा करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. काही ठिकाणी ब्रिटीशकालीन इमारती आहेत. 87 पोलीस स्टेशनचे बांधकाम हाती घेतले गेले आहे. जेथे इमारत नाही, तेथे इमारत करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षात पोलीस स्टेशनबरोबर निवासी इमारतींसाठीही सरकारने मोठी तरतूद केली आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement