SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘सीएनजी’बाबत ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, वाहन मालकांचा होणार मोठा फायदा..!

महाराष्ट्राचा 2022-23 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री, तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 11 मार्च रोजी सादर केला. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या..

ठाकरे सरकारच्या या बजेटमध्ये वाहनधारकांसाठीही एक मोठा निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे, महाराष्ट्रात ‘सीएनजी’वरील ‘व्हॅट’ (VAT)  तब्बल 10 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय पवार यांनी जाहीर केला. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना ‘सीएनजी’ दरात (CNG Price) घट झाल्याने वाहन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

‘सीएनजी’वरील ‘व्हॅट’मध्ये कपात
महाराष्ट्रात आता ‘सीएनजी’वर 13.5 टक्क्यांऐवजी केवळ 3 टक्के ‘व्हॅट’ आकारला जाणार आहे, म्हणजेच राज्य सरकारने ‘व्हॅट’मध्ये थेट 10.5 टक्के कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘सीएनजी’ किलोमागे 5.75 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच दिल्ली-‘एनसीआर’मध्ये ‘सीएनजी’च्या किमती किलोमागे 1 रुपयांनी वाढवल्या होत्या.

महाराष्ट्र सरकारने गेल्या 7 महिन्यांत ‘सीएनजी’च्या किमतीत 20 रुपयांनी वाढ केली आहे. ‘महानगर गॅस लिमिटेड’ने जुलै-2021 मध्ये ‘सीएनजी’ (CNG) च्या किमती 2.58 रुपयांनी वाढवल्या होत्या. त्यावेळी ‘सीएनजी’ची किंमत 50 रुपये किलोपेक्षा कमी होती. मात्र, त्यानंतर दर वाढतच गेली..

Advertisement

ऑक्टोबर-2021 मध्ये ‘सीएनजी’ दरात 2 रुपयांची वाढ होऊन 54.57 रुपये प्रति किलो झाला. नोव्हेंबरमध्ये पुन्हा 3.06 रुपयांची वाढ झाली. 17 डिसेंबरला पुन्हा वाढ होऊन हा दर 63.50 रुपये किलोवर पोहोचला.आता ‘सीएनजी’चा दर 70 रुपये किलोच्या आसपास आहे.

‘सीएनजी’ दरात घट झाल्याने सर्वसामान्यांचा प्रवास स्वस्त होणार आहे. वाहनधारकांना स्वस्त इंधन मिळणार असल्याने मालवाहतुकीचे शुल्कही कमी होऊ शकते. त्यातून ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीही कमी होण्याचा अंदाज आहे.

Advertisement

इलेक्ट्रिक वाहन धोरण
अर्थमंत्री अजित पवार यांनी 2021 ते 2025 साठी ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण’ मंजूर केल्याची माहिती दिली. एप्रिल ते डिसेंबर-2021 दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी 157 टक्क्यांनी वाढलीय. 2025 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची भागीदारी 10 टक्के, तर मोठ्या शहरातील वाहतुकीत 25 टक्के भागीदारीचे उद्दिष्ट आहे. 2025 पर्यंत महाराष्ट्रात 5 हजार चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement