SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात, नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटाबाबत घडलं असं काही..

आपल्या सर्वांचाच लाडका कपिल शर्मा अफलातून मनोरंजन करत असतो. हा कपिल शर्मा (Kapil Sharma) आता नवीन वादात अडकला आहे. कॉमेडी किंग म्हणून ओळख असलेला कपिल शर्मा हा बऱ्याच वेळा कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असतो. स्लमसॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या आणि नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटासंबंधित आता तो एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे.

जागतिक ग्राहक दिन : वस्तू खरेदी करताना कोण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी; जाणून घ्या थोडक्यात

कपिल कोणत्या वादामुळे चर्चेत?

Advertisement

सध्या कपिलच्या शो चा एक एपिसोड पार पडला आहे. यामध्ये त्याने झुंड चित्रपटाच्या कलाकारांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचाही सहभाग होता. झुंड’ हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हेदेखील चित्रपटात आहेत.

तर झालं असं की, सोशल मीडियावर झुंड चित्रपटाच्या संपूर्ण टीमला का आमंत्रण दिले नाही असा प्रश्न चाहत्यांनी मांडला. कपिलने त्याच्या कॉमेडी नाईट्स विथ कपिल शो (Comedy Nights With Kapil) मध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटातील कलाकार किंवा त्यांच्या संपूर्ण टीमला आमंत्रण दिले नाही, असा आरोप चाहत्यांनी केला आहे, अशी माहीती आहे.

Advertisement

प्राप्त माहितीनुसार, झुंड (Zund Movie News) चित्रपटामध्ये ग्लॅमरस चेहरा नाही म्हणून कपिलने या टीमला आमंत्रण दिले नाही. या वादानंतर सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर कपिल शर्माचा शो ट्रेंड करतोय. त्याचे चाहते यावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. याला अपवाद म्हटलं तर त्या निर्मात्या सविता राज हिरेमठ या होत्या. त्यांनी कपिलला पाठिंबा दिल्याचं सांगण्यात येतंय.

एका मुलाखतीत निर्मात्या सविता या प्रकरणाविषयी म्हणाल्या, “आमच्या चित्रपटाचे प्रमोशन फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झाले. तोपर्यंत कपिल शर्मा एका आठवड्यासाठी वैयक्तिक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी परदेशात निघून गेला होता. कपिल तिथून आला, त्यानंतर आम्ही पुन्हा शोमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकलो नाही. शोमध्ये न जाण्यामागे हेच खरे कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘द कपिल शर्मा शो’ची टीम फक्त बिग बजेट चित्रपट किंवा स्टार कास्टसोबत शो करते असे काही नाही.”, असं त्या म्हणाल्या.

Advertisement

चित्रपटगृहात अनेक दिवस आपली छाप पाडणारा ‘झुंड’ चित्रपट देशभर रिलीज झाला. प्रदर्शित होण्याच्या आधीच झुंड चित्रपटातील गाण्यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. आताच्या आठवड्यात झुंड चित्रपटासोबतच ‘The Kashmir Files’ चित्रपटानेही चांगला गल्ला जमवला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकारांवर कपिल शर्मा शोमध्ये 25 लाख रुपये घेऊन आमंत्रित केल्याचा आरोप चाहत्यांनी कपिल शर्मावर केला आहे. या विधानावर विवेक अग्निहोत्री अजूनही ठाम आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी कपिल शर्माने ट्वीट करून ही एकतर्फी कथा असल्याचे म्हटले होते. मात्र, या प्रकरणी वाहिनीकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement