SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘मार्च एण्ड’पूर्वी उरका ‘ही’ कामे, नाहीतर बसू शकतो मोठा आर्थिक फटका..!

मार्च महिना.. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना.. ‘मार्च एण्ड.. हा शब्द अनेकांच्या तोंडी ऐकलेला असेल.. 31 मार्चपूर्वी आर्थिक क्षेत्राशी संबंधित कामे उरकण्यासाठी धावपळ उडालेली असते. मार्चअखेर आर्थिक कामे न झाल्यास त्यावर मोठा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळेच या महिन्याला एक वेगळे महत्व आहे..

दरम्यान, यंदाचा मार्च महिना अर्धा संपला असून, आता फक्त 15 दिवस हातात राहिले आहेत. त्यामुळे हे आर्थिक वर्ष (Financial Year) संपण्यापूर्वी आयकर नियोजन (Income Tax Planning) करणे महत्त्वाचे आहे. मार्चअखेर ही कामे पूर्ण न झाल्यास नवीन आर्थिक वर्षात त्रास सहन करावा लागू शकतो. 31 मार्चअखेर कोणती कामे पूर्ण करावी लागणार आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

कोणती कामे करावी लागणार..?

प्राप्तीकर रिटर्न
आतापर्यंत जर तुम्ही 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरलेला नसेल, तर 31 मार्चपर्यंत भरणे आवश्यक आहे. ‘इन्कम टॅक्स रिटर्न’मध्ये काही दुरूस्ती करायची असल्यास, ती 31 मार्चपूर्वी करता येणार आहे. त्यानंतर मात्र मोठा दंड भरावा लागू शकतो..

Advertisement

आयकर सवलत
तुम्हाला 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयकरात सवलत मिळवण्यासाठी 31 मार्चपर्यंत कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल.. त्यात तुम्ही ‘पीपीएफ’, सुकन्या समृद्धी सारख्या लहान बचत योजनांत गुंतवणूक करु शकता. ‘एलआयसी’चा हप्ता भरून कर वाचवू शकता.

आगाऊ कर
आयकर कायद्यानुसार, 10,000 रुपयांपेक्षा जास्त कर भरणारे करदाते आगाऊ कर (Advance Tax) भरू शकतात. तो 4 हप्त्यांमध्ये देऊ शकतो.

Advertisement

आधार  व पॅन लिंक
आधार आणि पॅन नंबर लिंक (Aadhar-PAN Link) करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. आधारकार्ड बरोबर पॅन लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. त्यानंतर तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. इन्कम टॅक्स रिटर्नही भरता येणार नाही. चुकून निष्क्रिय पॅन कार्ड वापरले, तर मोठा दंडही होऊ शकतो.

बँक खात्याचे ‘केवायसी’
बँक खात्याचे ‘केवायसी’ 31 मार्चपूर्वी करावी लागणार आहे. कोरोनामुळे बॅंक ‘केवायसी’ला सातत्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, आता 31 मार्च ही मुदत असून, तत्पूर्वी हे काम करावे लागणार आहे, अन्यथा तुमचे आर्थिक व्यवहार थांबू शकतात. तुम्ही आयकर परतावा घेऊ शकणार नाही.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement