SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयपीएल’ आता अधिक रोमांचक होणार, ‘डीआरएस’ ते ‘सुपर ओव्हर’पर्यंतच्या नियमांत मोठे बदल…!

इंडियन प्रीमियर लिग.. अर्थात ‘आयपीएल’ म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी जणू मेजवानीच.. लवकरच ही मेजवानी चाहत्यांसमोर येत आहे. ‘आयपीएल’चा (IPL- 2022) 15वा हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरू होत आहे. यंदा ‘आयपीएल’मधील संघांची संख्या 8 वरून 10 झाली. त्यामुळे यंदाच्या हंगामात अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत.

आयपीएलमधील 10 संघांची विभागणी 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. सर्व संघांमधील 70 सामने पुण्या-मुंबईत होणार आहेत, तर प्ले-ऑफमधील लढतींबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

Advertisement

दरम्यान, ‘आयपीएल’ स्पर्धेचा रोमांच अधिक वाढावा, यासाठी ‘बीसीसीआय’ने आता पुन्हा एकदा नियमांत बदल केले आहेत. त्यात संघांच्या ‘प्लेइंग इलेव्हन’पासून ते ‘डीआरएस’पर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. या नवीन नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…!

‘आयपीएल’मधील नवे नियम
‘प्लेइंग इलेव्हन’बाबत –
एखाद्या टीममधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यास, टीममधील अंतिम 11 खेळाडूंमध्ये (प्लेइंग इलेव्हन) बदल करता येईल. टीममधील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे ‘प्लेइंग इलेव्हन’ तयार करु शकत नसल्यास, सामन्याचे वेळापत्रक बदललं जाईल.

Advertisement

मात्र, नंतर ठरलेल्या वेळेतही सामना झाला नाही, तर त्यावर तांत्रिक समिती निर्णय घेईल. मॅच खेळवणं शक्य नसल्यास, ज्या टीममध्ये कमी खेळाडू आहेत, ती टीम पराभूत धरुन विरोधी टीमला 2 गुण मिळतील.

‘डीआरएस’ वाढले – प्रत्येक डावात आता ‘डीआरएस’ची संख्या एक ऐवजी दोन करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक डावात संघांना दोनदा ‘डीआरएस’ घेता येईल. यापूर्वी प्रत्येक डावात एकदाच डीआरएस घेता यायचा..

Advertisement

स्ट्राइकमध्ये बदल – एखादा फलंदाज ‘कॅच आऊट’ झाला नि त्यावेळी तो धाव घेण्यासाठी धावला असेल, तरी ‘स्ट्राइक’ बदलता येणार नाही. नवा फलंदाजच ‘स्टाईक’वर राहिल.. पण, ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कॅच घेतला असेल, तर मात्र बदललेली ‘स्ट्राइक’ गृहित धरली जाणार आहे.

‘टाय’ सामन्याबाबत – आता ‘प्ले-ऑफ’ नि फायनलमधील ‘टाय ब्रेकर’च्या नियमातही बदल करण्यात आला आहे. प्ले-ऑफ किंवा अंतिम सामना ‘टाय’ झाला, तर सुपर ओव्हर (super over) होईल. त्यातही निर्णय न झाल्यास लिगमध्ये जो संघ जिंकलेला असेल, त्याला विजेता मानला जाणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement