SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वीज ग्राहकांचा होणार मोठा फायदा.., सरकारकडून विलासराव देशमुख अभय योजना जाहीर..!

महावितरणचे राज्यात जवळपास 3 कोटी उच्चदाब व लघुदाब वीज ग्राहक आहेत. ग्राहकांकडील वीजबिलाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरण सातत्याने वेगवेगळे उपाय करीत असते. मात्र, त्यानंतरही अनेक ग्राहक वीजबिल भरीत नाहीत. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते..

डिसेंबर 2021 अखेर अशा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची संख्या सुमारे 32 लाख 16 हजार 500 झाली आहे. या ग्राहकांकडे सुमारे 7 हजार 716 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तसेच, फ्रँचायझी असलेल्या भागासह कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहकांकडे 9 हजार 354 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यात थकबाकीची मूळ रक्कम 6 हजार 261 कोटी रुपये आहे..

Advertisement

वीजबिलाची थकबाकी वाढत असल्याने महावितरणची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळलीय. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. या ग्राहकांकंडील थकबाकी वसुलीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकतीच एक योजना जाहीर केली.

‘विलासराव देशमुख अभय योजना’ (Vilasrao Deshmukh Abhay Yojana) असे या योजनेचे नाव आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे स्मरणार्थ अभय योजनेला त्यांचे नाव देण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली.

Advertisement

अभय योजनेबाबत..
– ‘विलासराव देशमुख अभय योजने’चा लाभ 1 मार्च 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ग्राहकांना घेता येणार आहे.
– कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी ही योजना लागू असेल..
– योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरल्यास थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ केला जाणार आहे.

– ग्राहकांनी थकबाकीची मुद्दल रक्कम एकरकमी भरल्यास मुद्दल रकमेत उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के, तर लघुदाब ग्राहकांना 10 टक्के आणखी सवलत मिळणार आहे.
– ग्राहकांना ही रक्कम सुलभ हप्त्याने भरायची असल्यास, मुद्दलाच्या 30 टक्के रक्कम एकरकमी भरावी लागेल, नंतरच त्यांना उर्वरीत रक्कम 6 हप्त्यांत भरता येणार आहे.
– ग्राहकाने उर्वरित हप्ते न भरल्यास माफ केलेले व्याज व विलंब आकाराची रक्कम पूर्ववत होणार आहे.

Advertisement

– थकबाकी वसुलीसाठी महावितरणने कोर्टात दावा दाखल केला असेल, पण ग्राहकांना या योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास, अशा ग्राहकांना महावितरणला दाव्याचा खर्च (न्यायालयीन प्रक्रिया खर्च) द्यावा लागेल.
– ग्राहकांना या योजनेचा फायदा घेऊन वीजपुरवठा पुन्हा सुरू करता येईल. त्यासाठी पुनर्विज जोडणी शुल्क व अनामत रक्कम भरावी लागेल.

दरम्यान, थकीत रक्कम हप्त्याने भरणाऱ्या ग्राहकांना चालू वीजबिलासह हप्त्याची रक्कम भरावी लागेल. महावितरणच्या बाजूने कोर्टाचा आदेश असेल व त्यास 12 वर्षांच्या वर कालावधी झालेला नसेल, ग्राहकाने कोठेही अपील केले नसल्यास या योजनेचा लाभ घेता येईल. कोर्टात वाद चालू असल्यास, योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement