SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

यंदा दहावीची परीक्षा असणार खास; पेपरदरम्यान विद्यार्थ्यांना मिळणार ‘या’ विशेष सुविधा..!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा (SSC exam) उद्यापासून (ता. 15) सुरु होत आहे. मंडळाकडून या परीक्षेची पूर्ण तयारी झाली आहे. ही परीक्षा पारदर्शक वातावरणात व्हावी, यासाठी मंडळाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, सर्व विद्यार्थ्यांना त्याचे पालन करावे लागणार आहे.

उद्यापासून (मंगळवार) दहावीची परीक्षेला सुरुवात होत असून, ती 4 एप्रिलपर्यंत चालणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होईल. त्यात सकाळच्या सत्रात सकाळी साडे दहा वाजेपासून परीक्षा सुरू होतील. उर्वरित पेपर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 3 वाजता सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांना कोरोना नियमाचे पालन करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

आकडेवारी
– विद्यार्थ्यांची नोंदणी – 16 लाख 39 हजार 172
– विद्यार्थी – 8 लाख 89 हजार 584
– विद्यार्थिनी – 7 लाख 49 हजार 487
– मुख्य केंद्र – 5050
– उपकेंद्र – 16,334
– एकूण – 21,384

कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांनंतर दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा खास असणार आहे. वर्षभर ऑनलाईन अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

विद्यार्थ्यांना मिळणार खास सुविधा

अधिक वेळ – कोरोनामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय राहिलेली नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिक वेळ मिळणार आहे. 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना 30 मिनिटे, तर 40 ते 60 मार्कांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अधिक देण्यात येणार आहेत.

Advertisement

आधी मिळणार प्रश्नपत्रिका – परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका लवकर समजावी, प्रश्नांचे आकलन करता यावं, यासाठी उत्तरपत्रिका देण्यापूर्वी 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार आहेत.

पुरवणी परीक्षा – विद्यार्थी ही परीक्षा पास होऊ शकले नाहीत, तर त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै ते ऑगस्टदरम्यान लगेच पुरवणी परीक्षा घेतली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

Advertisement

हेल्पलाईन नंबर – परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बोर्डाने विभागनिहाय हेल्पलाईन नंबर जारी  केले आहेत.

भरारी पथके – परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समिती स्थापन केली आहे. विशेष महिला भरारी पथक व विशेष अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

शाळा तेथे परीक्षा केंद्र – यंदा 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी 15 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्यात आले आहे. तेथे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतीलच अंतर्गत व बहिस्त परीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement