SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛍️ फ्लिपकार्टवर सेलचा धमाका सुरू; या कंपनीच्या फोन वर मिळणार भरगोस डिस्काउंट

खरेदी म्हटलं की मुहूर्त पाहूनच घेऊ, अशी आपल्या भारतीय लोकांच्या मनातील कल्पना असते. सध्या हे मुहूर्त अनेक ऑफलाईन आणि ऑनलाईन कंपन्याही फॉलो करतात. काहींना विक्री वाढवण्याची तर आपल्या सारख्या लोकांना खरेदीची घाई ही आलीच! ऑनलाईनच्या जमान्यात Amazon, Flipkart सारख्या कंपन्यांनी तर भारतात चांगलाच जम बसवला आहे.

होळीच्या निमित्ताने काही ना काही खरेदी करणाऱ्या लोकांसाठी आता फ्लिपकार्टनेही बिग सेव्हिंग डेज सेल (Big Saving Days Sale) ची घोषणा केली आहे. हा सेल 12 मार्चपासून सुरू होऊन तो 16 मार्च रोजी संपणार आहेत. त्यामध्ये अनेक वस्तूंवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत.

Advertisement

जाणून घेऊ डिस्काऊंट आणि ऑफर्सबद्दल…

▪️ग्राहक Apple iPhone, Samsung, Realme आणि Xiaomi ब्रँडचे काही स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. जर तुम्ही SBI कार्डने फोन खरेदी केला तुम्हाला 10 टक्के इंस्टंट सूटही मिळू शकते.

Advertisement

▪️ सॅमसंग चा Samsung Galaxy F12 (Sea Green) हा स्मार्टफोन 12,999 रुपयांना असणारा स्मार्टफोन एकदम स्वस्त म्हणजे फक्त 9,499 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल. SBI Credit Card ने खरेदी केल्यास यामध्ये अतिरिक्त 750 रुपयांची सुटही मिळेल.

▪️ Realme Narzo 30: Realme Narzo 30 स्मार्टफोनवर 1,500 रुपयांच्या सूटसह तुम्ही 14,499 रुपयांत तुम्ही खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन MediaTek Helio G95 चिपसेट सपोर्ट आणि 30W डार्ट चार्ज सपोर्टसह येतो.

Advertisement

▪️ Vivo V23 5G: Vivo V23 5G हा स्मार्टफोन भारतातील पहिला 50MP ड्युअल सेल्फी कॅमेरा फोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 29,990 रुपये असून ठराविक बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊन हा स्मार्टफोन तुम्हाला 29,240 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

▪️ Motoroal Edge 20 Fusion: 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेट सपोर्टसह येणारा आणि 108 मेगापिक्सेल कॅमेरा असणाऱ्या या फोनच्या खरेदीवर सध्या 18% सूट मिळून हा फोन 20,499 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

Advertisement

▪️ Xiaomi 11i हायपरचार्ज 5G: कंपनीच्या दाव्यानुसार, फक्त 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होणारा Xiaomi 11i हायपरचार्ज हा 31,999 रुपयांना असणारा जबरदस्त स्मार्टफोन तुम्हाला या सेलमध्ये केवळ 26,999 रुपयांना खरेदी करता येईल. एसबीआय क्रेडिट कार्ड वापरल्यास अतिरिक्त 750 रुपयांची सुटही मिळेल.

▪️ iPhone SE: नुकतेच लॉंच झालेले iPhone SE चे 128 GB मॉडेल 29,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. Apple Store वर iPhone SE (2020) ची विक्री थांबवण्यात आली आहे. पण हा फोन लिमिटेड स्टॉकमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून तो फ्लिपकार्टवरून 29,999 रुपयांना खरेदी करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement