SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

“भारताला प्रत्युत्तर…”, भारताचे मिसाईल पाकिस्तानात पडताच इम्रान खान यांचं धक्कादायक वक्तव्य..?

भारतीय सुपरसॉनिक क्षेपणास्त्र ( India’s Supersonic Missile News) 9 मार्च रोजी चुकून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते ते क्षेपणास्त्र पडल्यामुळे पाकिस्तानच्या बॉर्डरवर कसल्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नाही. त्यावेळेसच भारताने आपल्याकडून खेद व्यक्त केला असला तरी आता पाकिस्तानने प्रथमच त्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया देत एक टिप्पणी केली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आणि विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर घ्या जाणून

Advertisement

पाकिस्तानने काय म्हटलं..?

भारतातून 9 मार्च रोजी एक मिसाईल सुटलं आणि ते थेट पाकिस्तानात जाऊन कोसळलं होतं, त्यावेळी ते देखभाली करत असताना चुकून सुटल्याचा भारताकडून सांगण्यात आलं होतं. तेव्हा ते पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन पडलं असल्याने कसलंही नुकसान झालं नाही, अशी माहिती आहे. आता यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी (Pakistan Prime Minister Imran Khan)धक्कादायक वक्तव्य केले आहे. या प्रकारानंतर भारताने खेद व्यक्त केला होता. तर, पाकिस्तानी लष्कराने याप्रकरणी एक पत्रकार परिषद घेत भारतीय मिसाईल पाकिस्तानात पडल्याने काही भागात नुकसान झाल्याचं म्हटलं सोबतच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, “भारतीय मिसाईल आमच्या हद्दीत पडल्यानंतर पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देऊ शकला असता, पण आम्ही संयम दाखवला. तसेच, भारताकडून सुटलेले हे मिसाईल पाकिस्तानातील लाहोर शहरापासून 275 किमी अंतरावर असलेल्या मियाँ चन्नूजवळील शीतगृहावर आदळण्यापूर्वी अनेक विमान कंपन्यांना मोठा धोका निर्माण झाला होता मात्र, मिसाईल पडल्यामुळे पाकिस्तानमध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही”, असं ते म्हणाले. पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी पंजाबमधील हाफिजाबाद येथे विरोधकांच्या अविश्वास ठरावादरम्यान एका सभेत ही माहिती दिली. आपल्याला आपले सैन्य आणि देश मजबूत करायचा असल्याचंही इम्रान खान म्हणाले.

दरम्यान, त्या घटनेनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले की, पाकिस्तानमध्ये मिसाईल कोसळल्यानंतर भारताकडून जी प्रतिक्रिया देण्यात आली त्यावर पाकिस्तान समाधानी नाही. भारताकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणावर त्यांनी संयुक्त चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत मिसाईल पडल्याने त्यामागे असलेल्या कारणांची एकदा पुष्टी करण्यासाठी नेमक्या कारणांची पुष्टी करण्यासाठी पाकिस्तानने या घटनेची संयुक्त चौकशी करण्याचा प्रस्ताव नवी दिल्लीला दिला आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाकडून माहिती आली आहे.

Advertisement

भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या स्पष्टीकरणात काय?

रशिया-युक्रेन युद्ध सुरु असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर काही संवेदनशील गोष्टी होत असतात. संपूर्ण जाग सध्या तणावात असताना अशा काही घटना देशाच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकतात. सदर मिसाईल दुर्घटनेवर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करत म्हटलं की, 9 मार्च 2022 रोजी आम्ही दररोजच्या नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मिसाईल अपघाताने प्रक्षेपित झालं. तरी याप्रकरणी, भारत सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं असून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement