SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांनो! ‘ही’ शेती करा आणि कमवा लाखो रुपये उत्पन्न, खर्च येईल फक्त इतका..

शेती म्हणजे शेतकऱ्यांचा जीव की प्राण आहे. शेतात कोणतेही पीक घ्या, त्या पिकाला आपल्या पोराबाळांप्रमाणे जपणारा बळीराजा आपल्या पिकांच्या लागवडीपासून त्या पिकांचं पालनपोषण करून मोठं करतो आणि बहुतांश वेळा त्याच्या पदरी येतं ते नुकसान आणि नुकसानच! सध्या असं झालं आहे कधी अवकाळी आणि कधी हिवसाळा म्हणजेच अवेळी कधी पाऊस येईल आणि कधी हिवाळा येईल, याचा नेम नाही. शेती जणू तोट्याचा सौदा असेच समजले जाते, परंतु जर शेतीमध्ये आपण नवीन माहिती घेऊन थोडासा तपास काढला तरी तुम्ही कसे शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करू शकता ते चला जाणून घेऊ..

📚 पुणे मेट्रो रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी 

Advertisement

देशातील अनेक शेतकरी पिकाची लागवड करताना खूप कष्ट घेतात. मात्र आजकाल त्याला तंत्राचीही जोड असावी लागते पण हे मात्र बऱ्याच गोष्टीची उपलब्धता असताना देखील विसरून जातात. त्यामुळे त्यांना नुकसानाला समोर जावं लागतं. आज असं एक पीक आणि माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही भरपूर पैसे कमवू शकतात. तर मित्रानो तुम्ही एलोव्हेरा अर्थात कोरफड पाहिलीही असेल. या एलोव्हेराची मागणी हि देशांतर्गत आहेच पण ती देशाबाहेरील भागातही ती अत्यंत जास्त आहे.मग तिच्या लागवडीविषयी जाणून घेऊयात..

कोरफड हि अशी आहे जिच्यामुळे अनेक कंपन्यांना औषध म्हणून, शॅम्पू म्हणून, सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी वापर होतो. यासाठी जगात कोरफडीची मागणी खूप आहे. जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बघायला मिळणाऱ्या एलोव्हेराचा उपयोग कॉस्मेटिक इंडस्ट्रीपासून तर आयुर्वेदिक औषध बनवण्यापर्यंत सर्वच ठिकाणी केला जातो. म्हणूनच याची मागणी बारामाही बाजारपेठेत असते, म्हणून जर जे अनेक शेतकरी करत नाही त्यांनी हि कोरफडीची लागवड करा आणि चांगला बक्कळ नफा कमवा.

Advertisement

शेतकरी मित्रांनो आपण देखील एलोवेरा लागवड करून चांगले मोठी कमाई करू शकता. याच्या शेतीमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची लागवड 5 वर्षातून फक्त एक वेळा करावी लागते अर्थात याची लागवड केल्यानंतर सलग 5 वर्षे उत्पादन आपण मिळवू शकतो. एकदा लागवड केल्यानंतर एलोव्हेराच्या झाडातून मिळणारे बेबी प्लांट आपण दुसऱ्या शेतात लावून एलोव्हेराची शेती वाढवू शकता. असे सांगितले जाते की, एक एलोवेराचे झाड 4 महिन्यानंतर बेबी प्लांट उत्पादित करण्यासाठी तयार होते. आपण काही कंपन्यांशी करार करून एलोव्हेरा विकू शकता, म्हणजे आपला फायदा हा दुप्पट तिप्पट होईल यात शंका नाही.

कोरफडीच्या देश-विदेशात अनेक प्रजाती बघायला मिळतात, या असंख्य प्रजातीपैकी इंडिगो ही प्रजाती सर्वात जास्त आढळते. ही प्रजाती सामान्यतः आपल्या घरांमध्ये आढळते. याशिवाय कोरफडीची बार्बाडेन्सिस ही प्रजाती एलोव्हेराची मोठ्या प्रमाणात शेती करण्यासाठी चांगली आहे, असं म्हटलं आत. शेतकरी बार्बाडेन्सिस प्रजातीची लागवड करण्यावर जास्त वाव देतात, कारण या जातीच्या कोरफडीची पाने मोठी असतात आणि त्यातून आपल्याला जास्त एलोव्हेरा जेल निघते. परिणामी उत्पन्नही वाढते.

Advertisement

लागवड कशी करायची ?

कोरफडची लागवड करताना फेब्रुवारी ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यांत करता येऊ असते. हिवाळ्यात कोरफडची लागवड करू नये असा सल्ला तज्ज्ञ नेहमी देतात. लागवड करताना दोन रोपांमध्ये 2 फूट किंवा थोडे जास्त अंतर ठेवल्याने चांगले उत्पादन मिळू शकते. रोपाची लागवड केल्यानंतर, रोपांच्या वाढीनुसार वजनाचा अंदाज येत असल्यास शेतकरी वर्षातून किमान दोनदा त्याची पाने काढू शकतात आणि चांगला नफा मिळवू शकतात.

Advertisement

लागवड खर्च आणि उत्पन्न:

जर एक एकर क्षेत्रात कोरफड लागवड केली तर सुमारे 20 हजार किलो प्रत्येक वर्षाला कोरफडचे उत्पादन मिळू शकते. कोरफडची ताजी पाने विकली तरी किंमत 5 ते 6 रुपये किलो दराने मिळते. शेतकरी मित्रांनो आपण एक बिघा शेतात 12 हजार कोरफडीची रोपे अंदाजे सुमारे 40 हजार रुपये खर्च करून लावू शकतो. कोरफडीच्या एक रोपापासून जवळजवळ 3.5 किलोपर्यंत कोरफडीची पाने मिळतात आणि एका पानाची किंमत 5 ते 6 रुपयांपर्यंत असते. म्हणजेच एका झाडाची पाने सरासरी 18 रुपयांपर्यंत विकली जाऊ शकतात असा अंदाज आहे. एकंदरीत 40 हजार रुपयांची गुंतवणूक करून शेतकरी बांधव अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement