SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पोस्ट ऑफिस की बॅंक, ‘एफडी’वर कुठे मिळेल जादा व्याज..? कुठे करावी गुंतवणूक..?

फिक्स्ड डिपॉझिट.. अर्थात एफडी (FD).. सुरक्षित नि सुनिश्चित रिटर्न देणारी खास योजना.. पारंपरिक गुंतवणुकदारांमध्ये गुंतवणुकीसाठी बँकांचे ‘एफडी’ खूप लोकप्रिय आहे. कारण, संपूर्ण कालावधी पूर्ण झाल्यावर व्याजाची गॅरंटी असते. त्यामुळे गुंतवणुकीचे मूल्य किती होणार, याचा अंदाज येतो..

गेल्या काही दिवसांत बहुतांश बॅंकांनी ‘एफडी’चे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. त्यामुळे त्यातून ग्राहकांना जादा रिटर्न मिळत नाही. नुकतेच ‘पीएफ’वरील व्याजदरही 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणले आहेत. त्यामुळे सरकार दरबारी ठेवल्या जाणाऱ्या पैशांवर आता जादा व्याज मिळणार नसल्याचे दिसते..

Advertisement

बँकेत पैसे ठेवणं फायदेशीर राहिलेले नाही. उलट, व्याज मिळणे राहिले बाजूला, विविध सेवांच्या नावाखाली बॅंका ग्राहकांकडूनच मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल करतात. हे सारे माहिती असले, तरी आपला पैसा सुरक्षित राहावा, या उद्देशाने अनेक जण बॅंकांचे दारच ठोठावतात. तेथे पैसा सुरक्षित राहतो. शिवाय, काही का होईना, पण परतावा मिळतो…

बॅंकांसह पोस्ट ऑफिसमध्येही तुमचा पैसा सुरक्षित राहतो. शिवाय त्यावर व्याजही मिळते. मात्र, आता बँकेत पैसे ठेवायचे, की पोस्ट ऑफिसमध्ये, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक प्रकरणांमध्ये बँकांपेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये जास्त परतावा मिळत असल्याचे बोलले जाते. बँका की पोस्ट ऑफिस.. कुठे ‘एफडी’ केल्यास फायदा होईल, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

बॅंका की पोस्ट ऑफिस..?
मुदत ठेव केल्यावर मुदत पूर्तीपूर्वी खात्यातून पैसे काढल्यास पूर्ण व्याजदर मिळत नाही. त्यात तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. ‘एफडी’चा व्याजदर पूर्णपणे मॅच्युरिटी कालावधीवर अवलंबून असतो. बँका व संस्थांमध्ये सध्या एफडीवर 4 टक्के ते 7.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर आहे.

पोस्टाचा विचार केल्यास एफडीसाठी बॅंकांप्रमाणेच ‘पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट’ किंवा ‘पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट योजना’ आहेत. पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवी एक, दोन, तीन व पाच वर्षांसाठी असतात. त्याचे व्याजदर वेळोवेळी बदलतात. सध्याचे पोस्टाचे व्याजदर असे आहेत..

Advertisement
  • एका वर्ष  – 5.50 टक्के व्याज
  • दोन वर्ष – 5.50 टक्के व्याज
  • तीन वर्ष – 5.50 टक्के व्याज
  • पाच वर्ष – ६.७० टक्के व्याज

टाइम डिपॉझिट स्कीम
पोस्टाच्या या योजनेत 5 लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याज मिळेल. या योजनेत तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 10.74 वर्षे म्हणजे 129 महिने लागतील, तर 5 वर्षांत 6,91,500 रुपये इतकी रक्कम मिळेल.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement