SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

यू-ट्यूबच्या माध्यमातून कमवा खोऱ्याने पैसा..! त्यासाठी काय करायला लागेल..? वाचा सविस्तर

सध्याच्या काळात मनाजोगी नोकरी मिळवणे महाकठीण गोष्ट.. त्यातून ना कामाचे समाधान मिळते, ना आर्थिक प्राप्ती होते.. त्यामुळे नोकरीत अनेकांचे मन लागत नाही.. अशा लोकांसाठी ही बातमी महत्वाची आहे.. तुमच्याकडे थोडंस वेगळं टॅलेंट असेल, काहीतरी वेगळं, हटके करण्याची इच्छा असल्यास घरबसल्या तुम्ही अगदी खोऱ्याने पैसा ओढू शकता..

यू-ट्यूबवर तुम्ही अनेक हटके व्हिडीओ पाहून खळखळून हसला असाल.. असे व्हिडीओ तर आपणही करु शकतो, असेही मनात आले असेल.. तर व्हा तयार.. स्वतःचं यू ट्यूब चॅनेल सुरू करा नि वर्षाकाठी कमवा लाखो रुपये.. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्यंय..? पण, हो.. हे होऊ शकतं.. कसं? चला तर मग जाणून घेऊ या..

Advertisement

सध्या ‘यु-ट्यूबर्स’ हा शब्द अनेकांनी ऐकला असेल.. तुम्हाला ‘यु-ट्यूबर’ (You tuber) होता येईल की… त्यासाठी हवा फक्त वेगळा विषय.. डोक्यात भन्नाट कल्पना.. नि त्या प्रत्यक्षात आणण्याची जिद्द.. मग कुणीही ‘सक्सेसफुल यू ट्यूबर’ होऊ शकतो. चॅनेल सुरू केलं की हातात पैसै, असं होत नाही. त्यासाठी लागतं सातत्य नि कमालीचा संयमही..

कसे होणार यु-ट्यूबर..?
स्वतःचे यू ट्यूब चॅनेल सुरू करण्यासाठी हटके विषय हवा. असा विषय, ज्यावर तुम्ही व्हिडिओ करू शकता. असे व्हिडिओ सादर करताना तुमच्यात आत्मविश्वास हवा. लोकांना आवडणारा, त्यांच्या गरजेवर सोल्युशन देणाराही व्हिडीओ तुम्ही करु शकता. फक्त खोलात जाऊन त्या विषयाची माहिती असायला हवी..

Advertisement

तांत्रिक माहितीबाबत..
यू-ट्यूब चॅनेल सुरू करण्याआधी अटी-शर्ती पाहून घ्या. ‘यू ट्यूब क्रिएटर्स’ या अधिकृत चॅनेलवर त्याची सगळी माहिती आहे. यू ट्यूब चॅनेलसाठी मोठा सेटअप लागत नाही. शूटिंगसाठी मोबाइल, व्हिडिओ एडिटिंगसाठी लॅपटॉप नि इंटरनेट सुविधा. कॅमेरा हाताळणी, व्हिडिओ एडिटिंगची माहिती असायला हवी.

पैसे कसे मिळतात?
यू ट्यूबचे काही नियम आहेत, ज्यांची पूर्तता केल्यावर तुम्हाला पैसे मिळू लागतात. सर्वात आधी तुमचे चॅनल ‘गुगल ऍड सेन्स’ला कनेक्ट करा. मात्र, आज यू ट्यूब चॅनेल तयार केलं नि अॅड सेन्सला कनेक्ट केलं, असं होत नाही. त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करावी लागते.

Advertisement

वर्षभरात तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासांचा ‘वॉच टाइम’ असायला हवा. तुमच्या चॅनेलवर ‘2 Step Verification’ करणं गरजेचं आहे. तुमच्या चॅनलवर कोणताही ऍक्टिव्ह कम्युनिटी स्ट्राइक नसला पाहिजे. या निकषांची पूर्तता झाल्यानंतरच तुम्हाला यू ट्यूबपासून पैसे कमावता येतात.

यू ट्यूब काय पाहतं..?
– तुमच्या चॅनलची थीम
– सर्वात जास्त व्ह्यूज मिळालेला व्हिडिओ
– तुमचे नवीन अपलोड्स, व्हिडिओचे टायटल्स, डिस्क्रिप्शन आणि टॅग्स

Advertisement

ही पथ्ये पाळा
– चॅनेलची भाषा चांगली असावी, शिवीगाळ नको..
– कंटेन्टमध्ये अश्लीलता, बीभत्सता, समाजविघातक कृती, व्यसनाधीनता, हिंसाचार नसावा. रिपीट कन्टेन्ट नकाे.
– एका विषयावर चार व्हिडिओ बनवू शकता, मात्र त्याचा कन्टेन्ट वेगळा असावा.
– इतरांनी बनवलेल्या व्हिडिओ वापरुन तुमचे व्हिडिओ बनवू नका.
– टेम्प्लेटेड व्हिडिओ वारंवार वापरू नका. एकाच प्रकारचं टेम्प्लेट सेट करून व्हिडिओ बनवू नका
– अॅड सेन्स अकाउंट एकदाच बनवू शकतात. त्यासाठी तुमचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावं.

Advertisement