SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘जिओ’कडून जबरदस्त ‘रिचार्ज प्लॅन’ सादर, ग्राहकांचा होणार मोठा फायदा..!

टेलिकाॅम क्षेत्रातील सध्याचे भारतातील आघाडीचे नाव म्हणजे, अर्थातच ‘रिलायन्स जिओ’… काही दिवसांपूर्वी टेलिकाॅम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यामुळे वाढत्या महागाईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. अशा वेळी इतर कंपन्यांची तुलनेत ‘जिओ’चे प्लॅन काहीसे स्वस्त मिळत असल्याचे दिसते..!

रिलायन्स जिओने (Jio) अनेक स्वस्तात मस्त प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. सध्या अनेक जण 28 दिवस वैधता, अनलिमिटेड काॅलिंग नि महिनाभर नेट डेटा असणाऱ्या प्लॅनला पसंती देतात. ‘जिओ’ने अशा ग्राहकांसाठी कमी किंमतीत शानदार प्लॅन उपलब्ध करुन दिले आहेत. जिओच्या अशाच काही प्लॅन्सबाबत जाणून घेऊ या..!

Advertisement

जिओचा 299 रुपयांचा प्लॅन
– जिओच्या 299 रुपयांच्या या सर्वाधिक लोकप्रिय प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते.
– कंपनीकडून वापरकर्त्यांना रोज 2GB डेटा मिळतो.
– यूजर्सना 28  दिवसांत एकूण 56GB डेटा मिळतो.
– यूजर्सना दररोज 100 ‘एसएमएस’ फ्री मिळतात
– शिवाय अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा मिळतो.

239 रुपयांचा प्लॅन
– वापरकर्त्यांना थोडा कमी डेटा हवा असल्यास कंपनीने 239 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.
– या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2GB ऐवजी 1.5GB डेटा मिळतो.
– या प्लॅनची वैधताही 28 दिवसांची आहे.
– अमर्यादित कॉल नि 100 ‘एसएमएस’चे फायदेही मिळतात.

Advertisement

दरम्यान, 28 दिवसांच्या वैधतेमध्येच आणखी कमी किंमतीचा प्लॅन ग्राहकांना हवा असल्यास, जिओने 209 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड काॅलिंग व ‘एसएमएस’ सुविधा मिळत असली, तरी रोज फक्त 1GB डेटा मिळणार आहे.

अधिक डेटा हवा असल्यास…
सध्या अनेक जण ‘वर्क फ्राॅम होम’ नोकरी करीत असल्याने, अशा ग्राहकांना अधिक डेटाची गरज पडते.. अशा ग्राहकांसाठी ‘जिओ’ने 601 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे.. हा प्लॅनही 28 दिवसांचा असून, त्यात यूजर्सला दररोज 3GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, डेटा नि ‘एसएमएस’ सुविधा तर आहेच, पण त्याच वेळी डिस्ने+ हाॅटस्टारचे सबस्क्रिप्शनही मिळते.

Advertisement

दरम्यान, वरील सर्व प्लॅनमध्ये ग्राहकांना ‘जिओ’ अॅप्सचे ‘सबस्क्रिप्शन’ मोफत मिळते. ग्राहक त्यावर मनोरंजन, माहिती, बातम्या पाहू शकतात. त्याचा आनंद घेऊ शकतात..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement